आनंदाचा शिधा योजना |
मिञांनो या पोस्टमध्ये जाणून घेऊ राज्य शासनाच्या महत्वाच्या योजने विषयी या योजनेचे नाव आहे आनंदाचा शिधा
चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहीती.
सरकार कडून मिळणार आनंदाचा शिधा
महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे .राज्यातील शिधापञिका धारकांना गौरी गणपती दिवाळीसाठी १०० रूपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंञिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मूख्यमंञी एकनाथ शिंदे होते.
प्रत्येकी एक कीलो साखर,रवा,चनाडाळ,आणी एक लिटर खाद्यतेल असा हा आनंदाचा शिधा राज्यातील जनतेला १०० रूपयात मिळणार आहे .
जाणून घेऊ या शिधाचा लाभ कोणत्या लाभार्थीनां मिळणार आहे .
या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कूंटूब शिधापञिकाधारक तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील दारिद्रय रेषेखालील ( एपीएल ) व केशरी शिधापञिका धारकांना शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे .
शूक्रवार १ सप्टेबर पासून आनंदाचा शिधा वितरीत होण्यास सूरवात होणार आहे १ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये आनंदाचा शिधा कीटचे वितरण केले जाणार आहे.
कसे होणार शिधा वाटप
एकनाथ शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सणासूदीच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता त्यानूसार मागील वर्षी दिवाळीमध्ये व तसेच गूढीपाडवा आणी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त आनंदाच्या शिधाचे स्वस्त धान्य दूकानामधून वितरण करण्यात आले होते आता गौरी - गणपती सणानिमीत्त आनंदाचा शिधाचे वितरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे प्रत्येक जिल्हानिहाय लाभार्थ्यांचीं यादी निश्चित करण्यात आली आहे . ई Pos द्वारे स्वस्त धान्य दूकानामधून आनंदाचे शिधाचे वितरण केले जाणार आहे त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना अन्न व नागरी पूरवठा विभागाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
कधी होणार शिधा वाटप ?
हा शिधा जिन्नस १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिम्मित्त व त्यानंतर १२ नोव्हेंबर पासून सूरू होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त शासनाच्या अन्न व नागरी पूरवठा विभागा मार्फत वितरीत येणार आहे.राज्यातील एकूण १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधापञिका धारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.
या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अणूषंगिक खर्चासह ८२७ कोटी ३५ लाख इतक्या अंदाजित खर्चास मंञिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे .
प्रती संच २३९ रूपये या दराने हा शिधा जिन्नस संच खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.अशाप्रकारे ह्या आनंदाच्या शिधाचा निर्णय मंञिमंडळ बैठकीत झाला असून त्याचा लाभ अनेक नागरिकांना होणार आहे.
0 Comments