वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे - उपमूख्यमंञी अजित पवार

medical college meeting 


मूंबई येथे उपमूख्यमंञी तथा अर्थमंञी अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीत अजितदादा पवार यांनी नागरीकांच्या आरोग्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहीती.

वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे - उपमूख्यमंञी अजित पवार

मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. 

तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालय येथील बैठकीदरम्यान दिल्या.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. 

या बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वित्त विभागाच्या सचिव शैला ए, संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments