मिञानो कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. जाणून घेऊ याविषयी सविस्तर माहीती.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी करू नये सरकार करणार मदत - पालकमंञी दादा भूसे
केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.
या संदर्भात नाशिकचे पालकमंञी दादाजी भूसे यांचे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले असता पालकमंञी दादाजी भूसे यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी काळजी करू नये सरकार त्यांच्या पाठीशी असून राज्य सरकार शेतकऱ्यांना सर्वोत्परी मदत करण्याचा प्रयत्न करेल.
या विषयावर चर्चा करून लवकरच कांदा प्रश्नावर तोडगा काढू असे पालकमंञ्यानी बोलताना सांगितले आहे.
निर्यात शुल्क वाढीमुळे कांदा दर कोसळतील ही भीती व्यापारी आणि शेतकऱ्यांना होती त्यामूळे शेतकरी व व्यापारी चिंताग्रस्त झाले होते.
निर्यात शूल्क दर वाढीमूळे कांद्याचे दर कोसळतील या भीतीने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलासा दिला त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की कांदा प्रश्ना संदर्भात केंद्र शासनासोबत चर्चा करून कांदा प्रश्न सोडवण्याबाबत राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही कांद्याचे दर पडणार नाहीत याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल असे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
कांदा प्रश्न सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. काही दिवसापूर्वी कांद्याचे दर 300 ते 400 पर्यंत खाली आले होते. त्यावेळी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले होते.
आता सूद्धा शेतकऱ्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही राज्य शासन शेतकऱ्यांना सर्वोत्परी मदत करेल शेतकऱ्यांनी कूठल्याही प्रकारची काळजी करू नये असे पालकमंञी दादा भूसे यांनी सांगून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
तर मिञांनो ही होती कांदा प्रश्ना संदर्भातील महत्त्वाची बातमी मी आशा करतो की तूम्हाला ही बातमी नक्कीच आवडली असेल व तूम्ही ही माहीती इतर लोकांसोबत नक्कीच शेअर कराल धन्यवाद.
0 Comments