मिञांनो एक महत्वाची बातमी समोर आली आहे भारताने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान 3 ने दिनांक 23/8/2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रूवाजवळ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केले आहे या लँडीग विषयीची महत्वाची अपडेट समोर आली आहे जाणून घेऊ या विषयी अधिक माहीती.
चंद्रावर कसे उतरले रोव्हर
चांद्रयान 3 बाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.भारताच्या इस्रो या अंतराळ संशोधन संस्थेने अवकाशात सोडलेले चांद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वी लँडीग केले आहे.
या चांद्रयान 3 मध्ये जे रोव्हर आहे त्याचे नाव प्रज्ञान रोव्हर आहे हे प्रज्ञान रोव्हर चंद्रावर कशाप्रकारे उतरले याचा व्हीडीओ इस्रोने शेअर केला आहे.
विक्रम लँडरमधील लँडर मॉड्यूल कॅमेऱ्याने काढलेला हा व्हिडिओ आहे. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:04 मिनिटांनी 'चांद्रयान-3'ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केलं होतं. यानंतर काही तासांनी त्यातून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडलं होते. प्रज्ञान रोव्हर हे चंद्रावर विविध प्रकारचे संशोधन पार पाडणार आहे.
भारताने रचला इतिहास
चंद्राच्या दक्षिण ध्रूवाजवळ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोडलेल्या चांद्रयान 3 ने यशस्वीपणे लँडीग करताच चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करून भारताने नवीन इतिहास रचला आहे.
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील चौथा, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत पहिलाच देश ठरला आहे.
चांद्रयान-3 हे चंद्रावर 14 दिवस विविध प्रकारचे संशोधन करणार आहे. व महत्वाची माहीती इस्रो या भारतीय अनूसंधान संस्थेला पूरविणार आहे.
तर मिञांनो ही होती चांद्रयान 3 बद्दल महात्वाची अपडेट मला खाञी आहे की तूम्हाला ही बातमी आवडली असेल व तूम्ही ही बातमी इतर लोकांसोबत नक्की शेअर कराल धन्यवाद,
0 Comments