महाश्रमदान शिबीर

Mahashramdan shibir
महाश्रमदान शिबीर

महाश्रमदान शिबीर बीड

दिनांक 26/8/2023 रोजी महाराष्ट्र  राज्यातील बीड येथे जिल्हा सामान्य रूग्णालय मध्ये महाश्रमदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरामध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयातील वर्ग  १ ते वर्ग ४ मधील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
स्वतः डॉक्टर ,नर्सेस, टेकनिशियन,कर्मचारी श्रमदान करत असल्याचे बघून जिल्हा रूग्णालयातील रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांना रूग्णालय परीसरामध्ये स्वच्छता ठेवण्याची प्रेरणा मिळाली आहे असे अनेक रूग्णालय परीसरातील नागरीकांनी श्रमदान शिबीरानंतर सांगितले.

कसे केले शिबीराचे नियोजन

जिल्हाशल्यचिकीत्सक बीड डॉ.नागेश चव्हाण यांनी जिल्हा रूग्णालयाचा परीसर स्वच्छ राहावा व रूग्णालय परीसरामध्ये स्वच्छता राखण्याची नागरीकांनां प्रेरणा मिळावी या उद्देशाने या महाश्रमदान शिबीराचे आयोजन केले होते ज्यामध्ये डॉक्टर ,कर्मचारी सहभागी झाले होते .

कोण झाले शिबीरमध्ये सहभागी

या शिबीरामध्ये जिल्हा रूग्णालयातील प्रयोगशाळा विभागातील व कोव्हीड आरटीपीसीआर लँब मधील डॉक्टर ,लँब टेकनिशियन,डाटा एट्री आॕपरेटर,चतूर्थ श्रेणी कर्मचारी यांनी उत्सफूर्तपणे सहभाग नोंदवला.

अतिशय चांगल्या हेतूने आयोजित केलेले हे महाश्रमदान शिबीर यशस्वी झाले असून नागरीकांनी जिल्हाशल्यचिकीत्सक बीड डॉ.नागेश चव्हाण यांचे व जिल्हा रूग्णालयातील सर्व डॉक्टर , लँब टेकनिशियन,अधिकारी ,कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments