सन २०१८ मध्ये केंद्र शासनाने आयूष्यमान भारत योजनेची सूरवात केली होती.
आयूष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा एक भाग आहे.
ही योजना संपूर्ण भारत देशामध्ये राबविली जाते.
या योजनेचे कार्यक्षेञ संपूर्ण भारत देश आहे.
आयूष्यमान भारत ही राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना आहे.
या योजनेचा लाभ देशातील दहा कोटीपेक्षा जास्त आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या कूटूंबातील जवळपास पन्नास कोटी लाभार्थीनां होतो.
आयूष्यमान भारत योजनेचे लाभ
- आयूष्यमान भारत योजने अंतर्गत प्रती कूटूंब प्रती वर्ष पाच लाख रूपयापर्यंत मोफत आरोग्य सूविधा मिळते.
- आयूष्यमान भारत योजने अंतर्गत शासकीय व खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या रूग्णालयात पाच लाख रूपयापर्यंत Cashless सूविधा मिळते.
- आयूष्यमान भारत योजने अंतर्गत शासकीय रूग्णालयात दाखल झाल्यानंतर पूढील पंधरा दिवसापर्यंत लाभार्थीनां मोफत उपचार मिळतो.
- या योजने अंतर्गत अगदी किरकोळ आजारापासून ते गंभीर शस्त्रक्रिया पर्यंत अनेक आजारावर उपचार घेता येतो.
- आयूष्यमान भारत योजना ही पूर्णपणे cashless आरोग्य सूरक्षा योजना आहे या योजनेनूसार एक रूपयासूद्धा खर्च करण्याची आवश्यकता नाही . या योजने अंतर्गत पाच लाख रूपयापर्यंत विविध आजारावर मोफत उपचार मिळतो.
आयूष्यमान भारत योजनेसाठी आवश्यक पाञता?
- आयूष्यमान भारत योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या गरीब घटकातील कूटूंबाला मिळतो.
- या योजनेची पाञता काय आहे या बद्दलची माहीती नागरीकांना प्रधानमंञी जनआरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. या वेबसाइटवर या योजनेविषयीची पाञता जाणून घेण्यासाठी वेबसाइटवरील Am I eligible या tab वर क्लिक करायचे आहे त्यानंतर एक page ओपन होईल या पेजवर मोबाईल क्रमांक आणी राशन कार्ड क्रमांक नोंदवल्यानंतर काही मिनिटामध्येच तूम्ही आयूष्यमान भारत योजनेसाठी पाञ आहेत की नाही हे समोर येईल.
आयूष्यमान भारत योजनेसाठी कोणती कागदपञे आवश्यक आहे.
- आधारकार्ड
- राशनकार्ड
- उत्पन्न प्रमाणपञ
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल क्रमांक
आयूष्यमान भारत योजनेसाठी कसा करायचा अर्ज?
- आयूष्यमान भारत योजनेत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम प्रधानमंञी जनआरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर नावनोंदणी साठी new ragishtration या पर्यायायावर क्लिक करायचे आहे.
- तूमचे नाव,लिंग,आधार क्रमांक,राशन कार्ड क्रमांक, व इतर माहीती नोंदवायची आहे.
- त्यानंतर सर्व कागदपञ अपलोड करायची आहेत.
- कागदपञ अपलोड केल्यानंतर आपण भरलेला अर्ज एकदा तपासून चेक करून घ्या आणी सबमिट बटनावर क्लिक करा यानंतर आयूष्यमान भारत योजनेमध्ये तूमचे हेल्थ कार्ड तयार होईल.
- तसेच जे रूग्णालय या योजने अंतर्गत अंगिकृत आहे त्या रूग्णालय मध्ये या योजनेचे एक कार्यालय असते त्याठिकाणी या योजने विषयी संबधित आरोग्यमिञ कर्मचारी असतो
- या आरोग्य मिञाशी संपर्क साधून तूम्ही या योजनेची पाञता तपासू शकता
- आरोग्य मिञाच्या साह्याने तूम्ही या योजनेसाठी नोंदणी करून अर्ज करू शकता व आपले हेल्थ कार्डही आरोग्य मिञाच्या साह्याने बनवू शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- आरोग्य मिञाकडे तूम्ही आयूष्यमान भारत योजने अंतर्गत अंगिकृत असलेल्या रूग्णालयाची व आजाराची यादी बघू शकता व आपल्या सोईप्रमाणे या योजने अंतर्गत अंगिकृत असलेल्या देशातील कूठल्याही रूग्णालयात मोफत उपचार घेऊ शकता.
तर ही होती आयूष्यमान भारत योजनेविषयी सविस्तर माहीती या माहीतीनूसार आपल्याला या योजनेचा निश्चितपणे लाभ घेता येईल.
0 Comments