महाराष्ट्रात सूरू झाली आयूष्यमान भव मोहीम Ayushman Bhav Mohim Started in Maharashtra

Ayushman Bhav Mohim Started in Maharashtra
ayushman bhav mohim started


देशामध्ये आयूष्यमान भव मोहीम राबवणे हा केंद्र शासनाचा एक उपक्रम आहे.
केंद्र शासन देशाच्या स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंञालय द्वारे ही मोहीम राबवत आहे.
देशाच्या विविध राज्यामध्ये आयूष्यमान भव मोहीम राबवली जात आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये सूद्धा Ayushman Bhav Mohim या मोहीमेचा प्रारंभ झाला असून जाणून घेऊ या विषयी अधिक माहीती.

Ayushman Bhav Mohim Started in Maharashtra

महाराष्ट्र राज्यामध्ये आयूष्यमान भव मोहीम राबविणे बाबत केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंञी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य भवन मूंबई येथे एक नियोजनपूर्व व आढावा बैठक आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली होती.
या बैठकी बाबतची सविस्तर माहीती मी माझ्या मागिल लेखामध्ये सूद्धा दिली होती.
तर मिञानो या बैठकीमध्ये राज्यामध्ये आयूष्यमान भव मोहीम राबविणे बाबत योग्य त्या मार्गदर्शक सूचना व दिशानिर्देश केंद्रीय आरोग्यमंञी यांनी राज्यातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या 
ही मोहीम महाराष्ट्र राज्यामध्ये १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे त्यानूसार महाराष्ट्र राज्यामधील सर्व जिल्ह्यामध्ये या मोहीमेची सूरवात झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचन बद्धतेनूसार प्रत्येक शहर, गाव खेड्यातील प्रत्येक घटकातील शेवटच्या नागरीका पर्यंत आरोग्य सूविधा मिळावी यासाठी आयूष्यमान भव मोहीम देशातील विविध राज्यामध्ये राबविली जात आहे.
समाजातील सर्व घटकातील प्रत्येक नागरीकाला आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आयूष्यमान भव मोहीम मध्ये आयूष्यमान आपल्या दारी या उपक्रमानूसार आयूष्यमान सभा आयोजित केले जाणार आहेत वैद्यकीय महाविद्यालये द्वारे आरोग्य शिबिर आयोजित केले जाणार आहेत त्यानूसार नागरीकांची आरोग्य तपासणी करून उपचार केले जाणार आहेत.
तसेच आयूष्यमान भारत कार्डचे वाटप आरोग्य विभागाच्या वतीने मोफत केले जाणार आहे.

Ayushman bhav Mohim Started in Maharashtra 

आयूष्यमान भव मोहीम अंतर्गत खालील नमूद सूविधेचा लाभ नागरीकांना होणार आहे.
१) आयूष्यमान भव मोहीम अंतर्गत नागरीकांचीं मोफत तपासणी केली जाणार आहे
२) रक्तदान शिबीर आयोजित केले जाणार आहे.
३) नेञ तपासणी, व तसेच इतर आजारासाठी आवश्यकता असल्यास शासकीय रूग्णालयामध्ये एक्सरे, सोनोग्राफी सह इतर रक्त,लघवी, च्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.
४) स्वच्छता शिबीर आयोजित केले जाणार आहे.
५) ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येकाला आरोग्य सूविधेचा लाभ मिळावा या हेतूने आयूष्यमान सभा आयोजित केले जाणार आहे
६) क्षयरूग्ण शोधून त्यांना योग्य ते उपचार मोफत दिले जाणार आहेत
७) आयूष्यमान भव मोहीम अंतर्गत आयूष्यमान आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण व नागरीकांचीं तपासणी करून उपचार दिले जाणार आहेत व आरोग्य सेवाचीं माहीती सांगितली जाणार आहे.
७) तसेच राज्यातील जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय  व इतर सर्व शासकीय रूग्णालय मध्ये नेञरोग तपासणी, स्ञीरोग तपासणी, बालरोग तपासणी, ह्रदयरोग, व मधूमेह तपासणी करण्यात येणार आहे तसेच प्रसूती व इतर आजारावरील शस्त्रक्रिया आयूष्यमान भव मोहीम अंतर्गत केल्या जाणार असून आरोग्य सूविधाचा लाभ प्रत्येकाला मिळण्याच्या दृष्टीने आयूष्यमान भव मोहीम १५ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधी दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये राबविली जाणार आहे.

Ayushman Bhav Mohim Started in Maharashtra

आयूष्यमान भव मोहीमेचे उद्घाटन 
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरावर आयूष्यमान भव मोहीमेचे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार योग्य नियोजन करून आयूष्यमान भव मोहीमेचे उद्घाटन जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करून आयूष्यमान भव मोहीमेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरीकांनीं या मोहीम अंतर्गत आरोग्य सूविधेचा लाभ घेण्याचे अवाहन शासनाच्या व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे 
तसेच खाजगी क्षेञानीही या उपक्रम मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे अवाहन सूद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

तर मिञानो आयूष्यमान भव मोहीम या शासनाच्या महत्वकांशी उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्यामध्ये झाला असून या लेखामध्ये ही मोहीम कशी राबवली जाणार आहे व या मोहीमेचे लाभ काय या बद्दल सविस्तर माहीती आम्ही तूम्हाला दिली असून मी आशा करतो की तूम्हाला ही माहीती आवडली असेल व Ayushman Bhav Mohim Started in Maharashtra हा लेख तूम्ही इतर लोकांना फायदा होण्याच्या दृष्टीने त्यांच्या सोबत नक्की Share कराल धन्यवाद .

Post a Comment

0 Comments