कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार सातव्या वेतन आयोगानुसार पगार

Contractual Employee payment increase
समान काम समान वेतन

भारतामध्ये विविध राज्यांमध्ये कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे शासकीय विभागामध्ये कंत्राटी कर्मचारी नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे आपआपल्या पदा नुसार काम करत आहेत परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा खूप कमी वेतन आहे हे नाकारता येणार नाही कमी वेतनामध्ये कंत्राटी कर्मचारी नियमित कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने काम करतात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढावे ही नियमित कर्मचाऱ्यांचीही इच्छा आहे तसेच शासनाची सुद्धा इच्छा असल्याचे दिसून येते कारण भारतातील काही राज्यांनी त्यांच्या राज्यातील कर्मचाऱ्यांना कंञाटी कर्मचाऱ्यांप्रमाणे पदानुसार वेतन वाढ दिली असून समान काम समान वेतन या सूत्रानुसार पगार वाढ दिली आहे याप्रमाणेच आता मध्य प्रदेश राज्य शासनाने ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यांच्या राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पदानुसार नियमित कर्मचाऱ्यांच्या समकक्ष म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे जाणून घेऊ याविषयी अधिक माहिती

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार सातव्या वेतन आयोगानुसार पगार.

मध्यप्रदेश राज्यातील आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांच्या समकक्ष वेतन वाढ मिळणार आहे. 'Contractual employees payment increase'    त्याबाबतचा निर्णय मध्य प्रदेश राज्यातील राज्य आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे ही बैठक 12 सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती या बैठकीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील विविध 51 संवर्गातील पदाचीं वेतन श्रेणी निश्चित करण्यात आली असून सातवे वेतन आयोगानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे.

समान काम समान वेतन

कंञाटी कर्मचारी नियमित कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने सर्व कामे करतात.
कंञाटी कर्मचारी व नियमित कर्मचारी यांचे कामाचे स्वरूप त्या त्या पदानूसार सारखेच आहे कामही तेवढेच आहे. कामाचे तासही सारखेच आहे परंतु वेतनामध्ये खूप तफावत आहे.
कंञाटी कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित कर्मचारी पेक्षा खूप कमी आहे यामूळे कंञाटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देण्यात यावे या बाबतची मागणी कंञाटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना अनेक वर्षापासून करत आहेत महाराष्ट्र राज्यातही saman kam saman vetan या प्रमूख मागणी साठी आंदोलन झालेले आहे.
काही राज्यानी या बाबतचा निर्णय घेऊन कंञाटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आता मध्यप्रदेश राज्याने ही या बाबतचा निर्णय घेऊन समान काम समान वेतन देण्याची कार्यवाही सूरू केली आहे.

वेतन वाढीला वित्त विभागाची मंजुरी

मध्यप्रदेश राज्यातील राज्य आरोग्य समितीच्या गव्हर्निंग बॉडीच्या दिनांक 12/9/2023 रोजी दुपारी बारा वाजता झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदाची नियमित कर्मचाऱ्यांच्या समकक्ष वेतन श्रेणी निर्धारित करण्यात आलेली आहे.
त्यास मध्य प्रदेश राज्यातील वित्त विभागाने मंजुरी दिली असून त्याचा लाभ एकूण 51 संवर्गातील पदावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
मध्यप्रदेश राज्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक यांनी त्यांच्या दिनांक 18/9/2023 रोजीच्या पत्रानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत विविध 51 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीस त्यांची वेतनश्रेणी निश्चित करून मंजुरी दिली आहे.
या पत्रानुसार आता मध्य प्रदेश राज्यातील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे.
तर ही होती कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबतची सविस्तर माहिती मला आशा आहे की तुम्हाला "contractual employee payment increase" ही माहिती आवडली असेल व तूम्ही ही पोस्ट इतर लोकांसोबत नक्कीच शेअर कराल धन्यवाद.

Post a Comment

0 Comments