शेतकरी सूद्धा करू शकतात क्रेडीट वर खरेदी Kisan credit card

Kisan Kredit Card
Kisan Kredit Card


'Kisan Kredit Card' मित्रांनो आज आपण जाणून घेऊ शेतकरी सूद्धा कसे करू शकतात क्रेडिट वर खरेदी या महत्त्वाच्या माहिती विषयी.
चला तर मग सूरू करूया आजचे आर्टीकल.
 आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे या आपल्या देशातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून असून शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना आणत असते जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकेल अशाच प्रकारची एक योजना आहे ती म्हणजे किसान क्रेडिट योजना .


शेतकरी सूद्धा कसे करू शकतात क्रेडीट वर खरेदी 

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे अनेक वेळा नुकसान होते अशा परिस्थितीत शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उद्भवते व अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता खाजगी संस्थेकडून उच्च दराने कर्ज घेण्याची आवश्यकता नाही सरकारने यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केलेली आहे मुळात 1998 मध्ये ही योजना सुरू झालेली आहे परंतु अनेक शेतकऱ्यांना योजनेची माहितीच नसते त्यामुळे ते या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात परंतु आता चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही आर्टिकल च्या माध्यमातून विविध योजनेची माहिती mahayojanamarathi.com या आमच्या वेबसाईटवर देत असतो तर शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून स्वस्त दराने कर्ज मिळते त्यांना इतर ठिकाणाहून उच्च दराने कर्ज घेण्याची आवश्यकता नाही शेतकरी किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून शेती विषयक वस्तूंचीं तसेच इतर कोणत्याही प्रकारची खरेदी करू शकतात.

 

शेतकरी किसान क्रेडिट कार्डचे लाभ :-

  • शेतकरी बियाणे व खताची तसेच शेती उपयोगी औजाराची खरेदी किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून करू शकतात 
  • किसान क्रेडिट कार्डवर फक्त चार टक्के व्याजदराने कर्ज मिळते हा महत्त्वाचा लाभ किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतो 
  • किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते किसान क्रेडिट कार्डचा लाभ 18 ते 75 वय वर्ष गटातील कोणतेही शेतकरी घेऊ शकतात 


किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे . 

  • शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे. 
  • आधार कार्ड, 
  • पॅन कार्ड 
  •  मतदान ओळखपञ


क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करावा व कोठे करावा.

किसान क्रेडीट कार्डचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेअंतर्गत बँक मध्ये खाते असणे व ते आधार लिंक असणे आवश्यक आहे किसान क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड साठी तुम्ही अर्ज करू शकता तर जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करा 
तेथील बँक कर्मचारी यासाठी तुम्हाला मदत करतील व तुमचा अर्ज भरून घेतील त्यासाठी तुम्हाला अर्जासोबत वर नमूद केलेली कागदपत्रे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड जमिनीचा सातबारा उतारा मतदान कार्ड रहिवासी पुरावा ही कागदपत्रे सादर करावी लागतील त्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी क्रेडीट कार्ड मिळेल तसेच तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकृत वेबसाईट द्वारे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता .
तर मित्रांनो ही होती किसान क्रेडिट कार्ड विषयी सविस्तर माहिती मला आशा आहे की तुम्हाला "Kisan kredit card" विषयीची माहिती आवडली असेल व तुम्ही ही माहिती इतर लोकांना सुद्धा फायदा होण्याच्या दृष्टीने ही पोस्ट त्यांच्यासोबत नक्कीच शेअर कराल .
धन्यवाद.

Post a Comment

0 Comments