किसान विकास पञ योजनेमध्ये रक्कम जमा करून ११५ महीन्यात मिळवा दामदूप्पट रक्कम Kisan Vikas Patra Yojana

Kisan Vikas Patra Yojana
Kisan Vikas Patra Yojana

मिञानों आज आपण जाणून  घेऊ किसान विकास पञ या योजनेविषयी या चांगल्या व महत्वपूर्ण योजनेची अनेक बहूतांश नागरीकांना माहीती नाही. या योजनेची नागरीकांना माहीती नसल्याने ते या योजनेपासून वंचित राहतात व आपल्या बहूमूल्य रक्कमेची इतर ठिकाणी गूंतवणूक करून स्वतःची फसवणूक करून घेतात.
ही योजना केंद्र शासन पूरस्कृत असल्याने व केंद्र शासनाची ही योजना असल्याने कूठल्याही प्रकारच्या फसवणूकीची या योजनेमध्ये शक्यता नाही व ही योजना चक्रवाढ व्याजदरानूसार निश्चित परतावा देते व ११५ महीण्यात गूंतवणूक केलेली रक्कम दामदूप्पट होते.
या योजनेमध्ये आकर्षक  व्याजदर व निश्चित परतावा मिळतो त्यामूळे या योजनेमध्ये गूंतवणूक करणे खूप फायदेशीर ठरते.
तर जाणून घेऊ किसान विकास पञ या योजनेचे लाभ,पाञता, व कसा घ्यावा या योजनेचा लाभ या योजनेविषयी सविस्तर माहीती.

Kisan Vikas Patra Yojana

किसान विकास पञ योजनेचे लाभ:-
  1. सूरवातीला ही योजना देशातील शेतकऱ्यांना बचतीसाठी प्रोत्साहीत करण्यासाठी सूरू करण्यात आली होती नंतर देशातील कोणाही सामान्य नागरीकाला या योजनेचा लाभ घेण्याची सवलत देण्यात आली आहे.
  2. या योजनेमध्ये गूंतवणूक केलेली रक्कम जोखीमरहीत असून सूरक्षित आहे कारण ही केंद्र शासन पूरस्कृत योजना असून या योजनेमध्ये गूंतवणूक केलेल्या रक्कमेवर केंद्र शासन व्याज देते आणी maturity ची देय रक्कम सूद्धा केंद्र शासनच देते त्यामूळे किसान विकास पञ योजनेमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम जोखीम रहीत व सूरक्षित असून या रक्कमेवर निश्चित परतावा मिळतो व कूठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही.
  3. या योजनेमध्ये खाते उघडतेवेळी जो व्याजदर मिळतो तोच व्याजदर या योजनेच्या पूर्ण कालावधी पर्यंत मिळत जातो त्यामूळे या योजनेमध्ये खाते उघडते वेळीच माहीती होते की या योजनेच्या maturity पर्यंत एकूण कीती रक्कम खातेदाराला परत मिळेल.
  4. या योजनेमध्ये आपल्या सोईनूसार किमान एक हजार रूपये व कमाल कीतीही रक्कम जमा करता येते फक्त ही रक्कम शंभरच्या गूणांकामध्ये असावी लागते.
  5. नॉमिनी नेमण्याची सूविधा सूद्धा या योजनेमध्ये उपलब्ध आहे खातेदाराचा जर काही कारणाने मृत्यू झाला तर किसान विकास पञामध्ये जमा रक्कमेचा लाभ त्याने नामित केलेल्या त्याच्या नॉमिनी व्यक्तीला मिळतो त्यामूळे कोणत्याही परीस्थीतीत या योजनेमध्ये जमा असणारी रक्कम डूबण्याची किंवा गमावण्याची शक्यता नसून ही रक्कम सूरक्षेची हमी देते.
  6. ही योजना मोठ्या कालावधी साठी असल्याने व या रक्कमेवर दरवर्षी चक्रवाढ दराने व्याजदर मिळत असल्यामूळे ११५ महिन्यानंतर म्हणजे जवळपास दहा वर्षानंतर निश्चितपणे दामदूप्पट रक्कम मिळते.
  7. किसान विकास पञ खात्याच्या हमीवर बँके कडून कर्ज सूद्धा मिळू शकते हा महत्वाचा लाभ या योजनेच्या खातेदाराला मिळतो कठीण समयी कर्जाची आवश्यकता असल्यास या योजनेचे खातेदार किसान विकास पञ खात्याच्या हमीवर बँकेकडून कर्ज घेऊ शकतात.
  8. काही विशिष्ट परिस्थिती मध्ये मूदतीपूर्वीच अडीच वर्षानंतर या योजनेमधील पूर्ण रक्कम काढता येवू शकते व या रक्कमेवरील व्याजही मिळते.
  9. या योजनेमधील किसान विकास पञ खाते दूसऱ्या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर  करण्याची सूविधा सूद्धा उपलब्ध आहे
  10. तसेच या योजनेमधील खाते देशातील कुठल्याही एका बँकेतून दूसऱ्या बँकेत व एका पोस्टातून  दूसऱ्या पोस्टात ट्रान्सफर करण्याची सूविधा सूद्धा उपलब्ध आहे खातेदाराच्या स्वतःच्या निवासस्थाना मध्ये बदल झाल्यास या महत्वपूर्ण सूविधेचा लाभ घेता येतो व रक्कम भरण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही.
आपल्या जवळच्या पोस्टात अथवा बँकेत रक्कम जमा करून या योजनेचा लाभ घेता येतो.

Kisan Vikas Patra Yojana 

किसान विकासपञ योजनेची पाञता:-
  • मिञानों सूरवातीला सन १९८८ मध्ये जेव्हा या योजनेची सूरवात झाली तेव्हा फक्त शेतकऱ्यांना रक्कम बचत करता यावी या हेतूने या योजनेची सूरवात करण्यात आली होती नंतर सरसकट कोणाही सामान्य नागरीकाला या योजनेमध्ये समाविष्ट होण्याची सवलत देण्यात आली.
  • त्यानूसार देशातील कोणत्याही प्रत्येक घटकातील नागरीकाला या योजनेचा लाभ घेण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे.
  • देशातील कोणीही प्रौढ नागरिक तसेच दहा वर्षावरील मूलाच्या नावानेही प्रौढ व्यक्ती किसान विकास पञाचे खाते उघडू शकतो.
  • दोन किंवा तीन व्यक्ती मिळून सूद्धा या योजने अंतर्गत संयूक्त खाते Joint Account उघडू शकतात.

Kisan Vikas Patra Yojana

या योजने अंतर्गत किती मिळते व्याजदर?

  • किसान विकास पञाच्या जमा रक्कमेवर ७.५ टक्के प्रतिवर्ष दराने आकर्षक चक्रवाढ व्याजदर मिळते
  •  या व्याजदरानूसार ११५ महिन्यामध्ये दामदूप्पट निश्चित रक्कम मिळते ११५ महिण्यामध्ये गुंतवणूक केलेली रक्कम ७.५ टक्के चक्रवाढ व्याजदरानूसार दूप्पट होते.
  • किसान विकास पञ घेतेवेळी जो व्याजदर निश्चित असतो तोच व्याजदर Maturity च्या कालावधी पर्यंत मिळत राहतो त्यामूळे योजनेच्या शेवटी किती रक्कम मिळणार हे सूरवातीलाच कळते.

Kisan Vikas Patra 

कसा घ्यावा किसान विकास पञ योजनेचा लाभ?
किसान विकास पञ योजनेचा लाभ घेण्यासाठी देशातील कोणत्याही बँकेमध्ये व पोस्टामध्ये किसान विकास पञ खरेदी करून या योजनेचे खाते उघडता येते.
किमान एक हजार रूपये व कमाल कितीही रक्कम आपल्या सोईनूसार जमा करून किसान विकास योजनेचा लाभ बँक किंवा पोस्ट कार्यालय मध्ये किसान विकास पञचे खाते उघडून घेता येतो.
तर मिञानो ही होती किसान विकास पञ विषयी सविस्तर माहीती या योजनेचे लाभ, पाञता, व्याजदर व या योजनेचे खाते कोठे व कसे उघडावे या बद्दलची सविस्तर माहीती आम्ही उपलब्ध करून दिली मला खाञी आहे तूम्हाला ही माहीती व लेख आवडला असेल व तूम्ही ही पोस्ट इतरांना माहीती होण्याच्या दृष्टीने इतर लोकासोबत नक्की SHARE कराल 
धन्यवाद

Post a Comment

0 Comments