नमो अकरा कलमी कार्यक्रम |
नमो अकरा कलमी कार्यक्रम महाराष्ट्र
मराठवाडा मूक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला सूभेदारी विश्रामगृह येथे राज्य मंञीमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये विविध महत्वाचे निर्णय मूख्यमंञी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आले.
या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानूसार महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी नमो अकरा कलमी कार्यक्रम जाहीर केला असून Namo Akra Kalmi Karyakram या कार्यक्रमामूळे महाराष्ट्रातील जनतेला खूप फायदा होणार आहे.
नमो अकरा कलमी कार्यक्रम महाराष्ट्र
प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिम्मित्त राज्य सरकारच्या वतीने नमो अकरा कलमी कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमाला राज्यमंञी मंडळाची मंजूरी सुद्धा मिळाली आहे.
तसेच जाहीर करण्यात आलेल्या नमो अकरा कलमी कार्यक्रमातील सर्व कामावर आमचे लक्ष असणार आहे आणी सर्व कामाची नियोजन व अंमलबजावणी चोख असेल आणी हे सर्व प्रधानमंञी मोदी साहेबांच्यां वाढदिवसानिम्मित्ताने असेल असे मंञिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पञकार परीषदेमध्ये मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी सांगितले . 'Namo Akra Kalmi Karyakram'
नमो अकरा कलमी कार्यक्रम महाराष्ट्र
नमो अकरा कलमी कार्यक्रमामध्ये खालील कामाचा समावेश करण्यात आला असून याचा लाभ महाराष्ट्र राज्यातील ७३ लाख महीला, लाखो शेतकरी, दलित मागासवर्गीय नागरीक, इतर सामान्य नागरीक, बांधकाम कामगार यांना होणार आहे नमो अकरा कलमी कार्यक्रम असा असेल.
१. ७३ लाख महिलांना शासकीय कार्यक्रमाचा लाभ मिळणार आहे . 40 लाख महिलांना शक्ती गटाच्या प्रवाहात जोडण्यासोबतच 20 लाख नवीन महिलांच्या शक्ती गटाची जोडणी करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत 5 लक्ष महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण, 5 लाख महिलांना उद्योग उभारणीसाठी भांडवल तसेच 3 लाख महिला उद्योजिकांना बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
२. नमो कामगार कल्याण अभियानातून ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच दिले जाणार असून बांधकाम कामगारांच्यां सूरक्षेची काळजी घेतली जाणार आहे.
३.नमो शेततळी अभियान राबवले जाणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढावे हा “नमो शेततळी अभियानाचा उद्देश आहे.
नमो शेततळी अभियानांतर्गत ७३ हजार शेततळयांची उभारणी करण्यात येणार असुन पडणाऱ्या प्रत्येक पावसाचा थेंब साठविण्यात येणार आहे. शेततळयाच्या माध्यमातुन शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करुन देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच याच शेततळयातून मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारण्यावरही भर देण्यात येणार आहे.
४. नमो आत्मनिर्भर व सौरऊर्जा गाव अभियानातून ७३ हजार गावे आत्मनिर्भर करण्याचा संकल्प आहे. या अभियानानूसार बेघर असलेल्या किंवा कच्चे घर असलेल्या सर्वांना पक्के घर बांधून देण्यात येणार असून सर्वांना १०० टक्के शौचालय सूद्धा बांधून देण्यात येणार आहे.शंभर टक्के पक्के रस्त्याचे जाळे उभारणे गावातील सर्वांनाच गावातच रोजगार उपलब्ध करुन देणे.
सर्व महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे.
पाण्याच्या संदर्भात स्वावलंबी बनवणे. शेंद्रीय शेतीसाठी साहाय्य व मार्गदर्शन करणे हे या अभियानाचे महत्वपूर्ण कार्य असून याचा लाभ अनेक लोकांना होणार आहे.
५. नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना सुरू करणार करण्यात येणार आहे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीब व मागासवर्गीयांना घरे बांधून देणे, पक्के रस्ते उभारणे, सर्व घरामध्ये वीजपूरवठा करणे, समाजमंदीर उभारणे ही कामे या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार असून याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे
६. नमो ग्राम अभियानातून प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायती उभारण्यात येणार असून आधूनिक सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पूर्णपणे सौर उर्जेचा वापर होईल यासाठी सूद्धा नियोजन करण्यात येणार आहे. तसेच इंटरनेट सूविधा देणे व संपूर्ण गावासाठी नियंत्रण कक्ष उभारणे ही कामे या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
७. नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानातून ७३ शाळा उभारण्यात येणार आहे.अत्याधूनिक संसाधने असणारी शाळा उभारणे, वेगवान इंटरनेट सूविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान आणी डिजिटल शिक्षण देणे,व अंतराळ विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे इत्यादी कामे या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
८. नमो दिव्यांग शक्ती अभियानातून दिव्यांग पुनर्वसन केंद्रे उभारण्यात येणार आहे .दिव्यांगांचे सर्व्हेक्षण व ओळख निश्चित करण्यात येणार आहे. दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र, परिवहन व रेल्वे पास आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. दिव्यांगांना आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे दिव्यांगांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे, दिव्यांगांना व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल व कर्ज देण्याबरोबरच दिव्यांगांचे व त्यांच्या पालकांचे या अभियानातुन समुपदेशन करण्यात येणार आहे. इत्यादी कामे या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
९. नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियानातून सुसज्ज क्रीडा मैदानाची उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे.
१०. नमो शहर सौंदर्यीकरण अभियानातून ७३ शहरांमध्ये शहर सौंदर्यीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
११. नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियानातून ७३ पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यात येणार आहे.
असा हा नमो अकरा कलमी कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे.
मिञानों मला खाञी आहे की तूम्हाला "Namo Akra Kalmi Karyakram" या लेखामधील माहीती आवडली असेल व तूम्ही हा लेख इतर लोकांना फायदा होण्याच्या दृष्टीने त्यांच्या सोबत नक्की SHARE कराल धन्यवाद .
0 Comments