नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर

नारी शक्ती वंदन बिल
नारी शक्ती वंदन बिल

Nari shakti vandan bil मिञानो आज आपण जाणून  घेणार आहोत नारी शक्ती वंदन या विधेयकाविषयी केंद्र शासनाने हे विधेयक आणले असून सार्वमताने हे विधेयक लोकसभेत पारीत झाले आहे .
जाणून घेऊ या विधेयक विषयी अधिक माहीती.

Nari shakti vandan bil pass in Loksabha

महीलांना आत्मनिर्भर व सशक्त करण्याच्या हेतूने व तसेच स्ञी पूरूषामध्ये कोणताही भेदभाव न करता पूरूषाच्या बरोबरीने महिलानांही सम्मान देण्यासाठी देशाच्या लोकसभा व राज्य विधान सभामध्ये महीलांना राखीव जागा देण्यासाठी केंद्र शासनाने नारी शक्ती वंदन विधेयक आणले होते.
केंद्रीय विधी व न्याय मंञी राम मेघवाल यांनी 'Nari shakti vandan bil हे विधेयक मंगळवार दिनांक 19/9/2023 रोजी अत्याधुनिक सोईसूविधा असलेल्या नवीन संसदेच्या लोकसभा सभागृहात सादर केले.
या विधेयकावर लोकसभेत सखोल चर्चा करण्यात आली .
या चर्चेमध्ये केंद्रीय मंञी स्मृती इराणी, कॉंग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभा खासदार सूप्रिया सूळे यांच्या सह एकूण साठ लोकसभा सदस्यानी सहभाग घेतला या विधेयकावर झालेल्या चर्चेचे उत्तर देताना केंद्रीय विधी व न्याय मंञी राम मेघवाल यांनी  राणी लक्ष्मीबाई, राणी अहिल्यादेवी होळकर, राणी दूर्गावती, राणी चेण्णम्मा सह अनेक थोर व शूरवीर महीलांचा उल्लेख करून महीला कोणत्याही बाबतीत पूरूषापेक्षा कमी नसल्याचे स्पष्ट केले.
तर महिला सशक्तीकरणाच्या मूद्यावर सर्व राजकीय पक्षानी एकञ येवून संपूर्ण जगाला एक संदेश द्यावा असे अवाहन केंद्र शासनाच्या वतीने केंद्रित गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
तसेच नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर होणे ही अतिशय गौरवास्पद व अभिनंदनिय बाब असून आम्ही महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने एक पाऊल पूढे टाकले आहे असे प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

Nari shakti vandan bil

कसे झाले या विधेयकावर मतदान ?
  • लोकसभेमध्ये चिठ्ठी मध्ये आपले मत नोंदवून नारी शक्ती वंदन विधेयकासाठी मतदान घेण्यात आले.
  • ज्यामध्ये nari shakti vandan bil विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली तर विधेयकाच्या विरोधात 2 मते पडली.
  • यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी नारी शक्ती वंदन विधेयक दोन तृतीयांश बहूमतानी पारीत झाल्याची घोषणा केली.

Nari shakti vandan vidhyek

काय आहे या विधेयकाचे महत्व ?
  • अत्याधूनिक सोई सूविधा असलेल्या खालच्या सभागृहात मंजूर होणारे हे पहिले विधेयक असून हे विधेयक महिलांच्या व देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण विधेयक आहे.
  • केंद्र शासनाने सादर केलेल्या या संविधानिक व संशोधन विधेयकानूसार लोकसभा व सर्व राज्य विधानसभामध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.
  • या विधेयकाला नारी शक्ती वंदन विधेयक हे नाव दिले गेले आहे.
  • देशाच्या लोकसभा व सर्व विधानसभा मध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण या विधेयकानूसार मिळणार आहे.
तर ही होती नारीशक्ती वंदन विधेयक या विषयीची माहीती मला आशा आहे की तूम्हाला "Nari shakti vandan bil Pass" हे आर्टीकल आवडले असेल व तूम्ही हे आर्टीकल इतर लोकांसोबत नक्की शेयर कराल धन्यवाद .

Post a Comment

0 Comments