महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या बाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी प्रकट केला आहे. जाणून घेऊ याविषयी अधिक माहिती.
विधान परिषद निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणी सुरू.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 9/8/2023 रोजी राज्य शासनाला दिलेल्या पञातील निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यातील मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघ तसेच मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ या मतदारसंघांमध्ये सन 2024 मध्ये द्विवार्षिक निवडणूक होणार आहे या होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी त्या विभागातील पदवीधर व शिक्षक यांची त्यांच्या दिनांक 1/11/2023 या अर्हता दिनांकावर पूर्णतः नवीन मतदार यादी तयार करण्याची मोहीम 'padvidhar shikshak navin matdar nondani mohim' दिनांक 30/9/2023 रोजी पासून सुरू होत आहे.
नवीन मतदार नोंदणी मोहीम अशी होणार नोंदणी प्रक्रिया
- दिनांक 30/9/2023 ते दिनांक 6/11/2023 या कालावधीत नवीन पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज स्वीकारण्यात येतील.
- पदवीधर मतदार नोंदणीसाठी फॉर्म 18 व शिक्षक मतदार नोंदणीसाठी फॉर्म 19 भरावा लागेल.
- दिनांक 23/11/2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
- तर दिनांक 23/11/2023 ते 9/12/2023 या कालावधीत दावे व हरकती नोंदवता येतील.
- तर दिनांक 30/12/2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. navin matdar nondani mohim maharashtra
- या निवडणुकीसाठी संबंधित विभागाचे विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असतील
- तर त्या विभागातील जिल्हाधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी असतील.
नवीन मतदारांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करावी मुख्य निवडणूक अधिकारी.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी व तसेच मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी मुंबई व कोकण विभागातील पात्र पदवीधर व्यक्ति व तसेच मुंबई व नाशिक विभागातील पात्र शिक्षकांनी मतदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करावी व आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तर मिञानो "Navin matdar nondani mohim" हा लेख तूम्हाला आवडला असेल हा लेख तूम्ही इतर लोकांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद .
0 Comments