निवासीशाळा आश्रमशाळा योजना महाराष्ट्र

निवासीशाळा आश्रमशाळा योजना
निवासीशाळा आश्रमशाळा योजना

niwasishala,ashramshala yojana in marathi मिञानों आजच्या नवीन आर्टीकल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मूला-मूलींसाठी निवासीशाळा,आश्रमशाळा योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविली जाते.
या योजनेची नागरीकांना माहीती व्हावी यासाठी मी आजचा लेख लिहीत आहे चला तर मग जाणून घेऊया या योजनेविषयी अधिक माहीती.

निवासीशाळा आश्रमशाळा योजना महाराष्ट्र

मिञानों महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक परीस्थीतीचा विचार केला तर असे दिसून येते की महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्हे हे दूष्काळी जिल्हे आहेत.
मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे.सततच्या पावसाच्या अनियमिततेमूळे शेतीचे वशेतीपूरक उद्योगधंद्याचे उत्पन्न मराठवाड्यामध्ये कमी आहे. 'Niwasishala ashramshala yojana in marathi'
सततच्या दूष्काळी परीस्थीतीमूळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी खूप कमी आहेत.
या सर्व कारणामूळे मराठवाड्यातील हजारो कूटूंबे रोजागाराच्या शोधात स्थालांतर करतात हे हजारो कूटूंबे ऊस तोडणीचे काम करतात.
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते एप्रिल महीना या कालावधी मध्ये ऊस गाळप हंगाम असतो त्यामूळे या कालावधीमध्ये मराठवाड्यातील हजारो कूंटूबे ऊसतोडीच्या कामासाठी महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये स्थालांतरीत होतात.
आई-वडीलाबरोबर त्यांच्या मूला-मूलींना देखील नाईलाजाने स्थालांतर करावे लागते.
त्यामूळे ही मूले वर्षानूवर्षे शिक्षणापासून वंचित राहतात.
तसेच ज्या मूलांनी स्थानिक शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे अशा मूलांनाही आपल्या लहान भावंडाचा संभाळ करण्यासाठी कूटूंबाबरोबर स्थालांतर करावे लागते.
त्यामूळे त्यांचेही शैक्षणिक नूकसान होते.
Niwasishala ashramshala yojana in marathi.
ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने ऊसतोड कामगारांच्या मूलामूलींसाठी निवासीशाळा आश्रमशाळा योजना राबविण्याचे ठरवले होते त्यानूसार महाराष्ट्र शासन ऊसतोड कामगारांच्या मूला-मूलींसाठी निवासीशाळा आश्रमशाळा योजना राबवित आहे.
ऊसतोडीच्या कामामूळे ऊसतोड कामगारांची मूले निरक्षर राहू नये असा या योजनेचा उद्देश आहे.Niwasishala ashramshala yojana in marathi विद्येचा प्रकाश मिळाला तरच जीवणातील अंधःकार दूर होऊन जीवनात प्रगल्भ सृजनशील विचाराने जीवन उजाळून निघेल निरक्षरचे साक्षर झाल्यानंतर सर्वस्तरावर सकारात्मक प्रगती होईल.
शिक्षण न मिळणे निरक्षर असणे एक प्रकारे अंधाराचे जीवन आहे या अंधारात विद्येच्या प्रकाश वाटेने आधी समाज गेला आणी समाजानेच निर्माण केलेली शासन नावाची शक्ती या वाटेवर विविध योजनांचें नंदनवन फूलवित आहे.

Niwasishala ashramshala yojana

महात्मा ज्योतीबा फूले यांनी म्हटल्याप्रमाणे 
विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली.
नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले
वित्तविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले !
प्रत्येक माणूस हा समाजात जन्मतो,जगतो,वाढतो,घडतो कींवा बिघडतो त्यास त्याची मती किंवा बूद्धीच कारणीभूत असते.प्रगल्भ सृजनशिल बूद्धी जर उपयोगितेच्या किनाऱ्याला लागली तरच तिचा समाजाला कूटूंबाला उपयोग होतो यासाठी शिक्षण असने गरजेचे आहे यासाठीच शासनाने निवासीशाळा आश्रमशाळा योजना अंमलात आणल्याचे दिसून येते.

निवासीशाळा, आश्रमशाळा योजनेसाठी पाञता.

निवासीशाळा आश्रमशाळा योजनेसाठी पाञ लाभार्थी 
१) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहीवाशी असावा.
२) लाभार्थी हा ऊसतोड कामगारांचाच मूलगा / मूलगी असावी.
हे या निवासीशाळा आश्रमशाळा योजना पाञतेसाठी निकष आहेत.
निवासीशाळा आश्रमशाळा योजनेचे लाभ 
या योजनेनूसार ऊसतोड कामगारांच्या निवासी विद्यार्थ्यांस मोफत निवास,मोफत भोजन,व शिक्षण देण्यात येते त्याचप्रमाणे अंथरूण,पांघरूण,क्रमिक पूस्तके,वह्या,शालेय साहित्य,व वैद्यकीय सूविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
निवासीशाळा आश्रमशाळा योजना राज्य सरकारच्या वतीने राबविली जात असल्याने राज्य सरकारच्या वतीने पूर्ण खर्च करण्यात येतो.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यां वेतनावरील १००%  खर्च शासनामार्फत केला जातो. इतर मान्य बाबीसाठी शाळा व वस्तीगृह विभागासाठी ८% आकस्मिक खर्च देण्यात येतो.

निवासीशाळा आश्रमशाळा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत .

१) संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी 
२) संबंधित शाळेचे मूख्याध्यापक
यांच्याकडे आपण या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करू शकता.
याप्रमाणे आपण या लेखामध्ये निवासीशाळा आश्रमशाळा विषयी माहीती वाचली ही योजना कशी राबविली जाते,या योजनेचे महत्व,योजनेचे स्वरूप,योजनेचे लाभ,अर्ज करण्याची पद्धत याबद्दल तूम्हाला या आर्टीकलमध्ये माहीती समजलीच असेल.
मी आशा करतो की तूम्हाला नक्कीच हे आर्टीकल आवडले असेल आणी हे आर्टीकल तूम्ही इतर लोकासोबत तूमच्या मिञ व नातेवाईकासोबत नक्कीच शेअर कराल "Niwasishala ashramshala yojana in marathi" जेणे करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजनेची माहीती पोहचेल धन्यवाद .

Post a Comment

0 Comments