सरकारी विभागामध्ये होणार बाह्यस्ञोत यंञणेद्वारे नोकर भरती आला शासन निर्णय nokarbharti shasan nirnay

सरकारी विभागामध्ये बाह्यस्ञोत यंञणेद्वारे कंञाटी पद्धतीने नोकर भरती होणार आहे.
खाजगी संस्था,एजन्सी, कंपनी, मनूष्यबळ भरती करणार आहे मनूष्यबळ भरतीसाठी नऊ सेवापूरवठादार एजन्सीच्या पॅनलची नियूक्ती करण्यात आली आहे.

Nokar Bharti shasan Nirnay 

जाणून घेऊ या संदर्भात सविस्तर माहीती.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा, व कामगार विभागाने वित्त विभागाच्या मान्यतेने ६ सप्टेंबर २०२३ रोजी नवीन शासन निर्णय G.R. काढला आहे. यानूसार आता खाजगी एजन्सीच्या निविदाकार पॅनल द्वारे महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय विभागामध्ये कंञाटी पद्धतीने एकञित व निश्चित मानधनावर नोकरभरती होणार आहे.

सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारावर शासनाचा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो त्यादृष्टीने ह खर्च कमी करून बचत झालेला निधी विकासाच्या कामासाठी वापरता यावा यासाठी शासन आता सरकारी विभागामध्ये कंञाटी पद्धतीने बाह्यस्ञोत यंञणेमार्फत मनूष्यबळ उपलब्ध करून घेणार आहे.  'Sarkari nokar bharti shasan nirnay'

बाह्यस्ञोत प्रक्रियेद्वारे मनूष्यबळ उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया उद्योग, उर्जा, व कामगार विभागाने दिनांक १८/०६/२०१४ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सूरू केली होती.

त्यानूसार बाह्यस्ञोत यंञणेद्वारे मनूष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी मे. ब्रिस्क fasilitys प्रा.लि., व क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्हिसेस प्रा.लि दोन निविदाकारांच्या पॅनलला तीन वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी देण्यात आली होती. तसेच सदर 
शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या पॅनलवरील एजन्सींची सेवा शासनाच्या अन्य 
विभागास घेण्यास मुभा देण्यात आली होती.
सदरील या दोन एजन्सीच्या मंजूर निवीदा पॅनलची तीन वर्षाची मूदत दिनांक १७/०६/२०१७ रोजी संपूष्टात आल्याने या एजन्सीनां आणखी तीन महिण्याची किंवा निविदाप्रक्रियेद्वारे नवीन बाह्यस्ञोत यंञणेची निवड होईपर्यंत मूदतवाढ देण्यात आली होती.
दरम्यान मूदतवाढ देवूनसूद्धा खूप कालावधी झाला होता त्यामूळे उद्योग,उर्जा,कामगार विभागाच्या दिनांक १८/१/२०२३ रोजीच्या शासननिर्णयानूसार सदरील दोन एजन्सीच्या पॅनलला मनूष्यबळ पूरवण्याची मूदतवाढ संपूष्टात आली आहे.

सदरील दोन एजन्सीच्या बाह्यस्ञोत यंञणेद्वारे मनूष्यबळ पूरवण्याची मूदत संपूष्टात आल्याने बाह्ययंञणेद्वारे मनूष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी नवीन मनूष्यबळ सेवापूरवठादार एजन्सीचे पॅनल नियूक्त करण्यासाठी कामगार आयूक्त यांचे अध्यक्षतेखाली निवीदा समीती गठीत करण्यात आली होती.

कशाप्रकारे झाली निविदा प्रक्रीया


या निवीदा समीतीने बाह्यस्ञोत पद्धतीने अतिकूशल,कुशल,अर्धकुशल व अकुशल या चार प्रकारचे बाह्यस्ञोत पद्धतीने  मनूष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी एजन्सीची निवड करण्यासाठी दिनांक २/९/२०२१ ते २७/४/२०२२ या कालावधीत निविदा प्रक्रीया राबवली.

या निविदाप्रक्रियेमध्ये एकूण २६ निविदाकार कंपनी व एजन्सीनी भाग घेतला होता.त्यापैकी शासनाच्या निविदा समितीने दहा निविदाकार एजन्सीनां पाञ ठरवले होते.

सदर निविदाकारांच्या पॅनलला मंजुरी देण्याचा प्रस्ताव कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य 
यांनी दिनांक 17.05.2022 रोजी शासनास सादर केला आहे. सदर प्रस्ताव मंञिमंडळाच्या 
दिनांक 8 मार्च, 2023 रोजीच्या बैठकीसमोर ठेवून त्यास मान्यता घेण्यात आली आहे. 
मंञिमंडळाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे राज्यामध्ये बाह्ययंत्रणे मार्फत मनूष्यबळ  पुरवठा करण्यासाठी 
10 निविदाकारपैकी एक एजन्सी वगळून नऊ (9) एजन्सींचे /संस्थांचे पॅनल तयार करणे तसेच 
अनुषंघिक बाबींना मान्यता देण्यासाठी दिनांक 14.03.2023 चा शासन निर्णय निगर्मित करण्यात आला आहे. Sarkari nokar bharti shasan nirnay

सदररील पॅनलवरील सेवापुरवठादारांच्या सेवा घेणे राज्य शासनाचे शासकीय विभाग /निमशासकीय विभाग / स्थानिक स्वराज्य संस्था / महामंडळे / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / इतर आस्थापना इ. यांना बंधनकारक करण्यात आले आहे.

कीती मिळणार कर्मचाऱ्यांना वेतन 

सेवापूरवठादार एजन्सीला सूधारीत दरमहा मनूष्यबळ दरापैकी पंधरा टक्के एवढी रक्कम सेवाशूल्क म्हणून देय राहील.तर १ टक्के रक्कम उपकर असंघटीत कामगार 
मंडळाकडे वर्ग करण्यासाठी कामगार विभागाला देय राहील. तर १ टक्के रक्कम संकीर्ण खर्चापोटी सेवापूरवठादार एजन्सीस देय राहील अशाप्रकारे एकूण १७ टक्के रक्कम वगळून उर्वरीत 83% रक्कम प्रत्यक्ष व 
अप्रत्यक्ष वेतन/सेवा स्वरुपात बाह्ययंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचारी यांना देय ठरेल.

म्हणजेच एकूण वेतनाच्या ८३ टक्के रक्कम वेतन स्वरूपात बाह्ययंञणेद्वारे नियूक्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
शासनाने मनूष्यबळाची खालील चार प्रकारामध्ये वर्गवारी केली आहे.

  1. अतिकुशल
  2. कुशल 
  3. अर्धकुशल
  4. अकुशल
या चार प्रकारामध्ये वर्गवारी केली असून या प्रकारानूसार व त्यातील नमूद पदानूसार पुरवठादार कंपनीला कंञाटी पद्धतीने भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना २५००० रुपये ते १२०००० रूपयापर्यंत दरमहा वेतन द्यावे लागणार आहे.
हा पगार पदानूसार व शासनाने निर्देशित केलेल्या वर्गवारीनूसार द्यावा लागणार आहे. 

खालीलप्रमाणे बाह्ययंञणेद्वारे नियूक्त कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे.


  1. अतिकूशल मनूष्यबळ  :- ७०००० रूपये ते १२०००० रूपये दरमहा
  2. कुशल मनूष्यबळ :-  ४०००० रूपये ७०००० रूपये दरमहा
  3. अर्धकुशल मनूष्यबळ :-३०००० रूपये दरमहा 
  4. अकुशल मनूष्यबळ २५००० रूपये एकञित वेतन दरमहा 
  5. या प्रमाणे चार प्रकारच्या वर्गवारीनूसार व पदानूसार  एकञित वेतन शासनाच्या अटीप्रमाणे भरती झालेल्या मनूष्यबळ यांना मिळणार आहे 
शासन निर्णय मधील प्रमूख तरतूदी
  • सदरील पॅनलचा कालावधी  पाच वर्षाचासाठी असून या कालावधीत दरमहा मनुष्यबळाच्या दरामध्ये कोणतीही वाढ अनुज्ञेय राहणार नाही.

  • सदर पॅनलवरील सेवापुरवठादारांच्या सेवा घेणे राज्य शासनाचे शासकीय विभाग / निमशासकीय विभाग/ स्थानिक स्वराज्य संस्था / महामंडळे / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / इतर आस्थापना इ. यांना बंधनकारक राहील. 

  • संबंधित विभागाने प्रभारी मंत्री महोदयांच्या मान्यतेने एजन्सीची नियुक्ती करावी.

  •  शासन निर्णयामधील तरतूदीनूसार सेवा पुरवठादार एजन्सीमार्फत उपलब्ध करावयाचे मनुष्यबळ महाराष्ट्र राज्यातील असेल.कोणत्याही परीस्थीतीत महाराष्ट्राबाहेरील मनुष्यबळाचा पुरवठा सेवापुरवठादार एजन्सीला करता येणार नाही "sarkari nokar bharti shasan nirnay"

  • या एजन्सीला फक्त महाराष्ट्रातीलच मनूष्यबळ घेण्याची परवानगी आहे महाराष्ट्राबाहेरील मनूष्यबळ नियूक्त करण्याची परवानगी एजन्सीला नाही अशी स्पष्ट तरतूद शासन निर्णयामध्ये शासनाने केली आहे.

  • तसेच ज्या जिल्ह्यात रिक्त पदे आहेत त्या जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे असे शासननिर्णयामध्ये स्पष्ट नमूद आहे. 

याप्रमाणे आता महाराष्ट्र राज्यातील सरकारी विभागामध्ये बाह्ययंञणेद्वारे मनूष्यबळ पूरवठा करून घेण्यात येणार असून या बाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


Post a Comment

0 Comments