International Old Person Day या आर्टिकल मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निगर्मित केला आहे हा शासन निर्णय शासनाने दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी काढला आहे जाणून घेऊ याविषयी अधिक माहिती.
International Old person Day
राज्य शासनाच्या दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजीच्या जीआर शासन निर्णयानुसार एक आक्टोंबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 'International Old Person Day' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 9 जुलै 2008 रोजी निगर्मित केलेल्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार घेतला आहे.
भारताच्या संविधानामध्ये जेष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे ज्येष्ठ नागरिकाचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या पद्धतीने घालवता यावा समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे व वृद्धापकाळामध्ये त्यांना कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, मिळावा, त्यांची आर्थिक क्षमता वाढावी आणि त्यांना सामाजिक मदत मिळावी यासाठी राज्याचे सर्वसामावेशक धोरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक नऊ जुलै 2008 मधील शासन निर्णयामधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात आलेले आहे.
या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार राज्यात सर्व ठिकाणी दिनांक 1 ऑक्टोंबर 2023 हा दिवस जागतिक जेष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
असा साजरा करण्यात येईल जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस
महाराष्ट्र राज्यात सर्व ठिकाणी एक ऑक्टोबर 2023 हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्ताने खालील उपक्रम कार्यक्रम राबवून international old person day हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
- एक ऑक्टोबर 2023 हा दिवस राज्यामध्ये सर्व ठिकाणी जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा करणे बाबत वृत्तपत्रामध्ये जाहिराती देण्यात येणार आहे.
- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्वजनिक पदयात्रा काढण्यात येणार आहे.
- राज्यात सर्व ठिकाणी प्रभात फेरी काढण्यात येणार आहे.
- सभा घेण्यात येणार आहे.
- विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा एनजीओंचा सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे.
- जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबिर चर्चासत्र परिसंवाद इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
- व तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींची माहिती देण्यात येणार आहे.
- तसेच वृद्धांचे हक्क जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोई सुविधा व योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन इत्यादी बाबत ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन व माहिती देण्यात येणार आहे.
अशा प्रकारे हे उपक्रम राबवून ज्येष्ठ नागरिक दिवस 1 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
कोणा मार्फत होणार ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस राज्यात सर्व ठिकाणी 1 ऑक्टोबर 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे.
- जागतिक जेष्ठ नागरिक दिवस राज्यातील सर्व जिल्हाधिकारी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय महानगरपालिका व नगरपालिका नगरपरिषदा मार्फत आयोजित करण्यात येणार आहे.
- त्याबाबतची स्पष्ट तरतूद या शासन निर्णयामध्ये करण्यात आली आहे.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार असून राज्यात सर्व ठिकाणी
1/10/2023 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
तर मित्रांनो हा होता "International Old Person Day" विषयीचा लेख हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल व हा लेख आपण इतर लोकांसोबत त्यांना जागतिक जेष्ठ नागरिक दिनाची माहिती व्हावी या दृष्टीने त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करावा धन्यवाद.
0 Comments