सार्वजनिक सुट्टीच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
ईद-ए-मिलाद या सणाच्या सार्वजनिक सुट्टी मध्ये बदल करण्यात आला असून शासनाने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे जाणून घेऊ या विषयी अधिक माहिती.
ईद-ए-मिलादच्या सार्वजनिक सुट्टी मध्ये बदल
राज्य शासनाने सन 2023 या वर्षीसाठी राज्यातील शासकीय कार्यालयांना एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्या पैकी ईद-ए-मिलाद या सणाची सार्वजनिक सुट्टी गूरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी घोषित करण्यात आलेली आहे ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण असून मुस्लिम बांधव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात या सणा दिवशी जूलूस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तसेच यावर्षी 28 सप्टेंबर या दिवशीच हिंदू धर्मियांचा अनंत चतुर्दशी हा सण सुद्धा आहे त्यामूळे दोन्ही समाजामध्ये शांतता व सलोखा राहावा यासाठी ईद ए मिलादची सूट्टी 28 सप्टेंबर ऐवजी 29 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे. 'Public holiday date change'
शासनाने जाहीर केली अधिसूचना.
ईद ए मिलाद सणाच्या दिवशी जूलूस आयोजित करण्यात येतो तसेच अनंत चतुर्दशी या दिवशी महाराष्ट्र राज्यात सर्वत्र गणेश मूर्तीची मोठी मिरवणूक आयोजित करण्यात येते व मिरवणुकीनंतर विसर्जन करण्यात येते यावेळी हिंदू बांधवांची मोठे गर्दी जमा होत असते अशा प्रकारे दोन्ही समाजाच्या सणाची मुस्लिम बांधवांचे जुलूस व हिंदू बांधवांचे श्री गणपती मिरवणूक व विसर्जन एकाच दिवशी असल्याने हिंदू मुस्लिम दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 ऐवजी शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे राज्य शासनाने "public holiday change" या बाबत दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी अधिसूचना प्रकट केली आहे त्यानुसार 28 सप्टेंबर 2023 रोजी सर्व शासकीय कार्यालय चालू असणार आहे तर 29 सप्टेंबर 2023 रोजी सार्वजनिक सुट्टी असणार आहे.
0 Comments