Cleanliness is the service |
एक तारीख एक साथ या उपक्रम अंतर्गत एक ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता देशाप्रमाणे बीड जिल्ह्यातही स्वच्छता हीच सेवा मोहीम राबवण्यात आली.
जाणून घेऊ या विषयी अधिक माहिती
बीड जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत एक तारीख एक साथ मोहीम राबवण्यात आली
या मोहीम मध्ये जिल्ह्यातील गावा गावातील नागरिक सहभागी झाले.
सर्वांनी या मोहीम मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला
विविध शासकीय कार्यालयामध्ये ही मोहीम राबवण्यात आली.
कोणी नोंदवला स्वच्छता हीच सेवा मोहीम मध्ये सहभाग
बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी व जिल्हा प्रशासनाने याबाबत नियोजन करून नागरिकांना व शासकीय कर्मचाऱ्यांना या मोहिमेमध्ये सहभागी करून घेतले. 'Cleanliness is the service'
नागरिकांनी ही स्वयंस्फूर्तीने या मोहीम मध्ये सहभाग नोंदवला.
आणि स्वच्छता हीच सेवा मोहीम एक तारीख एक साथ एक तास यशस्वी केली.
जिल्हा शासकीय रुग्णालय बीड येथे यशस्वी झाली स्वच्छता हीच सेवा मोहीम
बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय हे अतिशय महत्त्वाचे आहे.
या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतात.
या रुग्णालयामध्ये रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची ये जा मोठ्या प्रमाणात असते स्वच्छतेचे खरी गरज या ठिकाणी असते येथील स्वच्छता कर्मचारी रुग्णालय परिसरामध्ये दररोज स्वच्छता करत असतात. Cleanliness is the service
एक ऑक्टोबर 2023 रोजी देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानुसार
जिल्हा रुग्णालय बीड येथे सुद्धा स्वच्छता हीच सेवा मोहीम जिल्हाशल्यचिकीत्सक बीड, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियोजनानूसार निवासी वैद्यकीय अधिकारी रूग्णालय, व निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्यसंपर्क, यांच्या उपस्थिती मध्ये राबवण्यात आली.
जिल्हाशल्यचिकीत्सक यांनी रूग्णालय परीसरामध्ये स्वच्छता करून एक तारीख एक साथ या उपक्रमामध्ये आपले योगदान दिले.
या मोहीम मध्ये जिल्हा रूग्णालयातील सर्व विभागातील डॉक्टर, स्टाफ नर्स, ब्रदर,लॅब टेक्निशियन,कार्यालयीन कर्मचारी इतर Paramedical कर्मचारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, कॉलमन, यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळा व आरटीपीसीआर लॅब मध्ये लॅब मधील कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली.
तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागातील स्वच्छता करून स्वच्छता हीच सेवा मोहीम जिल्हा रुग्णालयांमध्ये यशस्वी केली.
यावेळी जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले व देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानुसार स्वच्छता मोहिमेमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले.
पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी केले होते स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
देशाचे पंतप्रधान व राज्याचे मूख्यमंञी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभरामध्ये स्वच्छता हीच सेवा एक तारीख एक साथ ही मोहीम राबवण्यात आली.
देशभरामध्ये प्रशासनाच्या नियोजनानुसार ही मोहीम राबवण्यात आली व यशस्वी झाली आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने आपल्या जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या मदतीने योग्य नियोजन करून स्वच्छता हीच सेवा एक तारीख एक साथ हा उपक्रम यशस्वी केला आहे.
तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण बातमी "Cleanliness is the service" ही बातमी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments