आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे होणार शासन सेवेत थेट समायोजन
महाराष्ट्रातील आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत थेट समायोजन करणे बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. 'Contractual employees will be regular'
हा निर्णय सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंञी डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 18/8/2013 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार उचित कार्यवाही करणे बाबतचे पत्र राजेंद्र कुडले अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना दिनांक 17/10/2023 रोजी दिले आहे.
कंत्राटी कर्मचारी संघटना व आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा निर्णय
- धीरज कुमार आयूक्त आरोग्य सेवा मुंबई
- सुभाष बोरकर सहसंचालक तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई
- राजेंद्र कूडले अवर सचिव आरोग्य विभाग मूंबई
- चांदेकर अवर सचिव ग्रामविकास विभाग मुंबई
- अनिल कुमार उगले अवर सचिव नगर विकास विभाग मुंबई
- प्रवीण घोरपडे कक्ष अधिकारी नगर विकास विभाग मुंबई
- किरण शिंदे राज्य अध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघटना
- अरुण खरमाटे समन्वयक राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघटना
कशा पद्धतीने होणार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या स्टाफ नर्स, Anm, टीबी सुपरवायझर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, या तांत्रिक व अतांत्रिक पदावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत प्रवेश करण्यासाठी सदर तांत्रिक व अतांत्रिक पदांच्या समकक्ष असलेल्या पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे तसेच सेवा प्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर या तांत्रिक व अतांत्रिक पदांच्या भरतीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे त्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीमध्ये रिक्त होणाऱ्या पदांच्या भरतीसाठी दुसरी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे अशा पद्धतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्यात येणार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.
0 Comments