Apar id for students मिञांनो एक नवीन महत्त्वाची बातमी आली आहे आता आधार नंतर विद्यार्थ्यांना मिळणार अपार क्रमांक या बाबतचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना देशातील सर्व राज्य सरकारला दिल्या आहेत.
या विषयीची सर्व माहीती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊ या बाबतची सविस्तर माहीती.
विद्यार्थ्यांना मिळणार अपार क्रमांक Apar id for students
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आता विद्यार्थ्यांचे अपार (ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडेमिक रेजिस्ट्री) आयडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
या बाबतचे पञ केंद्रीय शालेय सचिव संजय कूमार यांनी काढले असून विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याच्या सूचना सर्व राज्य सरकारला दिल्या आहेत. 'Apar id for students'
या अपार आयडीद्वारे विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक मिळणार असून, विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास त्यात साठवला जाणार आहे.
अपार क्रमांकाची वैशिष्ट्ये आणी उपयोग Apar id benefits
- अपार आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल पद्धतीने साठवण्यात येणार आहे.
- अपार आयडी मधील माहिती हवी तेव्हा ऑनलाइन उपलब्ध असेल.
- अपार आयडी द्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर देखरेख करता येणार आहे.
- विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांका वरूनच पालकांच्या संमतीने अपार आयडी तयार केला जाणार आहे त्यासाठी संमतीपत्र भरून द्यावे लागणार आहे.
- अपार आयडीमध्ये साठवली जाणारी माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्यांकडे एक स्वतंत्र युनिक आयडी असणे गरजेचे आहे. त्यानूसार अपार आयडी मध्ये अध्ययन निष्पत्ती, परीक्षांचा निकाल, समग्र अहवाल, विद्यार्थ्याने शैक्षणिक उपक्रमात केलेली कामगिरी, क्रीडा, कौशल्य प्रशिक्षण अशी सर्वंकष माहिती असेल.
कधी होणार तयार अपार क्रमांक Apar id for students
केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांनी विद्यार्थ्यांचे अपार आयडी ( Automated permanent Academic Account Registry ) तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधी मध्ये विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याच्या सूचना संबधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्यानूसार १६ ते १८ ऑक्टोबर 2023 या कालावधी मध्ये विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार केले जाणार आहेत.
अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार केले जाणार असून विद्यार्थ्यांचा संपूर्ण शालेय शिक्षणाचा प्रवास या मध्ये साठवला जाणार आहे या अपार आयडी मध्ये विद्यार्थ्यांचां शिक्षण विषयक सर्व डेटा उपलब्ध होणार आहे.
0 Comments