अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार शासनाच्या वतीने भाऊबीज भेट Bhau beej bhet

Bhaubeej Bhet for Anganwadi Employees
Bhaubeej Bhet

Bhaubeej Bhet for Anganwadi Employees  एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाकडून दिवाळी सणानिमित्त भाऊबीज भेट रक्कम मिळणार आहे. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार भाऊबीज भेट

महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, व मिनी अंगणवाडी सेविका या मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन 2023 - 2024 या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणापूर्वी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करणे बाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने दिनांक 18/10/2023 रोजी काढला आहे या शासन निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस स्वरूपात दोन हजार रूपये रक्कम मिळणार आहे. 

भाऊबीज भेट रक्कम दिवाळीपूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अदा करणे बाबतच्या स्पष्ट सूचना या शासन निर्णयाद्वारे राज्य शासनाने प्रशासनाला दिल्या आहेत. 'Bhaubeej Bhet for Anganwadi Employees'

भाऊबीज भेट अंतर्गत किती रुपये रक्कम मिळणार 

आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना  महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी दिनांक 12/9/2023 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट देण्यात यावी या बाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास सादर केला होता. Bhaubeej Bhet for Anganwadi Employees

या प्रस्तावानुसार सन 2023 - 2024 या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, व मिनी अंगणवाडी सेविका, या मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम महाराष्ट्र शासनाने मंजूर केली असून या बाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने दिनांक 18/10/2023 रोजी काढला आहे.

कधी मिळणार भाऊबीज भेट रक्कम

राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका, यांना दिवाळी सणापूर्वी भाऊबीज भेट रक्कम रुपये 2000 अदा करण्याच्या स्पष्ट सूचना महाराष्ट्र शासनाने आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना दिल्या आहेत यामुळे आता दिवाळीपूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट रक्कम मिळणार आहे. 

वाचा शासन निर्णय

तर ही होती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भाऊबीज भेट विषयीची महत्त्वाची माहिती. 

तुम्हाला "Bhaubeej Bhet for Anganwadi Employees" हा लेख आवडला असेल व तुम्ही हा लेख इतर लोकांसोबत नक्कीच शेअर कराल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments