मित्रांनो आज आम्ही आपल्याला महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती उपलब्ध करून देणार आहोत.
मुंबईत झाली राज्य शासनाची मंत्रिमंडळ बैठक
मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक दिनांक 3/10/2023 रोजी पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थित झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील नागरिकांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. 'Cabinet meeting decisions of maharashtra government'
राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय
- दिवाळीनिमित्त राज्यातील शिधापत्रिका धारक नागरिकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे या निर्णयानुसार राज्यातील जनतेला 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा मिळणार आहे आणि या शिधामध्ये आता मैदा आणि पोहे यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे या महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाचा अन्न नागरी पुरवठा विभाग करणार आहे.
- राज्यातील विदर्भ मराठवाडा विभागातील कृषी पंप विज जोडणी वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे तसेच उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ऊर्जा विभाग करणार आहे
- महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला असून यानुसार दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे अल्पसंख्याक विकास विभाग या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे
- महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथे पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात येणार असून 45 नवीन पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे राज्य शासनाचा विधी व न्याय विभाग या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे.
- इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार आहे विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून गृहनिर्माण विभाग या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे.
- गारगोटी येथील तंत्रनिकेतनच्या विनाअनुदानित शाखांना शासन 90 टक्के अनुदान देणार आहे याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे हे महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले असून निश्चितच या निर्णयाचा लाभ राज्यातील जनतेला होणार आहे.
0 Comments