राज्यभरात राबविली जाणार स्वच्छता हीच सेवा मोहीम. Ek tarikh ek sath mohim

Ek tarikh ek sath mohim
Ek tarikh ek sath mohim

राज्यभरात राबविली जाणार स्वच्छता हीच सेवा मोहीम या उपक्रम अंतर्गत एक तारीख एक साथ म्हणजे एकाच दिवशी एकाच वेळेला सर्वांनी सोबत 1/10/2023 रोजी सकाळी ठीक दहा वाजता आपल्या सभोवतालच्या परीसराची स्वच्छता करायची आहे. 
मित्रांनो सध्या राज्यामध्ये आयुष्मान भव मोहीम सुरू आहे ही मोहीम 15 सप्टेंबर 2023 ते  31 डिसेंबर 2023 पर्यंत राबविणे बाबतच्या सूचना शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत.
 या आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत दिनांक एक ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता आरोग्य हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जाणून घेऊ या विषयी अधिक माहिती.

स्वच्छता हीच सेवा मोहीम 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये आयुष्यमान भव्य मोहीम 17 सप्टेंबर 2023 पासून राबविण्यात येत आहे आयुष्यमान भव मोहीम अंतर्गत विविध उपक्रम राज्यामध्ये राबविण्यात येत आहेत याच उपक्रमाचा एक भाग म्हणून एक आक्टोंबर 2023 रोजी सकाळी ठीक दहा वाजता स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी सर्व ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम असून या अंतर्गत एक तास आपल्या सभोवतालची स्वच्छता सर्वांनी मिळून करायची आहे . 'Ek Tarikh Ek Sath' 
या उपक्रमासाठी शासनाच्या वतीने चला करूया स्वच्छतेसाठी श्रमदान एक तास एक साथ ही घोषणा देण्यात आली आहे.

कसा राबविण्यात येणार स्वच्छता हीच सेवा उपक्रम

आयुष्यमान भव मोहिम अंतर्गत विविध उपक्रम  दिनांक 15/9/2023 ते 31/12/2023 पर्यंत राबविण्या बाबतच्या सूचना केंद्र शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत.
 या मोहिम अंतर्गत सेवा पंधरवाडा यामध्ये स्वच्छ भारत अभियान उपक्रम अंतर्गत सर्व आरोग्य संस्था येथे स्वच्छता अभियान राबविण्यासाठी शासनाच्या वतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत Ek Tarikh Ek sath mohim
 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता राज्यातील सर्व आरोग्य संस्था मध्ये स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात यावा व सदर उपक्रमामध्ये सर्व आरोग्य संस्थातील अधिकारी व कर्मचारी व स्वयंसेवक यांनी कमीत कमी एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान देण्यात यावे तसेच याकरिता लोकप्रतिनिधी जन आरोग्य समिती सदस्य व रुग्णालय समिती यांना सहभागी करण्यात यावे असे शासनाच्या वतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार उद्या दिनांक एक ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
तसेच देशातील व राज्यातील सर्व नागरिकांनी आपापल्या सभोवतालच्या परिसराची एक तारीख एक साथ स्वच्छता करावी असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
 राज्यातील आरोग्य संस्था प्रमाणेच सर्व शासकीय कार्यालय आणि तसेच शहरातील प्रत्येक वार्डामध्ये व राज्यातील प्रत्येक गावामध्ये आरोग्य हीच सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 
त्यानूसार एकाच दिवशी एकाच वेळी एक ऑक्टोबर रोजी सकाळी देशातील सर्व नागरीकांनीं स्वच्छता मोहीमे मध्ये सहभागी होऊन आपल्या परीसराची स्वच्छता करायची आहे.
स्वच्छता हीच सेवा या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे अवाहन पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी केले आहे.
दोन ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे या जयंती निमित्ताने एक ऑक्टोबर 2023 रोजी सर्व नागरिकांनी स्वच्छतेसाठी एक तास द्यावा स्वच्छतेसाठी एक तास एक साथ सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आवाहन केले की स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाला लोक चळवळीचे स्वरूप द्यायचे आहे त्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे.
राज्यातील सर्व नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपले योगदान द्यावे.

स्वच्छता हीच सेवा या मोहीमसाठी प्रशासन करणार मदत.

 स्थानिक स्वराज्य संस्था महसूल आणि जिल्हा प्रशासन आपल्या मदतीसाठी सज्ज असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले त्यांनी राज्यातील नागरीकांना आवाहन केली की सर्वांनी स्वच्छता हीच सेवा या उपक्रम अंतर्गत एक तारीख एक साथ आपल्या सभोवतालच्या परीसरामध्ये श्रमदान करावे सर्वांनी शहरातील प्रत्येक वार्डात व तसेच प्रत्येक गावात प्रत्येकाने एकाच वेळी श्रमदान करावे व या स्वच्छतेच्या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे.
सर्वांनी आपला परीसर स्वच्छ व नीटनेटका करावा त्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, नगरपालीका, ग्रामपंचायत, व महसूल प्रशासन आपल्या मदतीसाठी सज्ज असेल असे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी राज्याला संबोधित करताना सांगितले आहे.
तर स्वच्छता हीच सेवा या विषयीची ही महत्वपूर्ण बातमी होती आपणही या समाज उपयोगी "Ek Tarikh ek sath" मोहीमेमध्ये सहभागी होऊन आपले योगदान द्यावे.

Post a Comment

0 Comments