Ghar Ghar Kcc Abhiyan मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने मोहीम सुरू केली आहे.
केंद्र शासनाद्वारे घर घर केसीसी अभियान राबवण्यास सुरुवात झाली आहे.
जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.
Ghar Ghar Kcc Abhiyan
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी घर घर केसीसी अभियान या मोहिमेची सुरुवात केली आहे. 'Ghar Ghar Kcc Abhiyan'
या मोहिमेचा लाभ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे, निविष्ठा, इत्यादी खरेदी करण्यासाठी तसेच शेतीच्या मशागतीसाठी आर्थिक मदत मिळावी व शेतकऱ्यांना बी बियाणे व खते सहजपणे खरेदी करता यावे या करिता किसान क्रेडिट कार्डचा उपयोग होणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांना आता खाजगी संस्थाकडून उच्च दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही हा महत्त्वाचा लाभ किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या कालावधीमध्ये राबविले जाणार घर घर केसीसी अभियान
केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाद्वारे घर घर केसीसी अभियानाची सुरुवात झाली आहे. Ghar Ghar kcc Abhiyan या अभियानाद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे.
तसेच पशुसंवर्धन, दूग्ध उत्पादन व मत्स्यपालन यातील पात्र लाभार्थ्यांना सुद्धा किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळणार असून घर घर केसीसी अभियान दिनांक 1/10/2023 ते 31/12/2023 या कालावधी मध्ये राबविले जाणार आहे.
अशा पद्धतीने राबविले जाणार घर घर केसीसी अभियान
या अभियान अंतर्गत जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग, जिल्हा परिषदेचे विविध विभाग, बँक, पंचायत समिती, ग्रामपंचायत, बँक प्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, यांच्या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत यासाठी गावा गावा मध्ये मेळावे घेतले जाणार आहेत.
या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज बँकेला प्राप्त झाल्यापासून 14 दिवसाच्या आत सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
पी.एम. किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत, आपल्या जवळच्या बँक शाखेशी किंवा नजीकच्या शासकीय कार्यालयाशी संपर्क साधून घर घर केसीसी अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तर ही होती घर घर केसीसी अभियानाची महत्त्वपूर्ण माहिती.
तुम्हाला "Ghar Ghar Kcc Abhiyan" हा लेख आवडला असेल व तुम्ही हा लेख इतर लोकांसोबत नक्कीच शेअर कराल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments