मंञीमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनाचे महत्त्वाचे निर्णय Government decisions

Government Decisions
Government Decisions

Government Decisions मंगळवारी महाराष्ट्र शासनाच्या मंत्री मंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये राज्याच्या हिताचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

या विषयी सविस्तर माहीती खालीलप्रमाणे.

मंञीमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनाने घेतले महत्वाचे निर्णय State government decisions.

मूंबई येथे महाराष्ट्र राज्य मंञीमंडळाची बैठक Cabinet meeting दिनांक 10/10/2023 रोजी पार पडली. 

या बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी मूख्यमंञी एकनाथ शिंदे होते.यावेळी उपमूख्यमंञी तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमूख्यमंञी अजित पवार व मंञीमंडळातील सदस्य उपस्थित होते. 'Government Decisions' 

या मंञीमंडळ बैठकीमध्ये विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली व राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मंञीमंडळ बैठकीत खालील नमूद महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

  1. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार मुलगी जन्माला आल्यापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत शासनाकडून तिच्या बँक खात्यात वयाच्या टप्प्यानुसार एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा केली जाणार आहे. राज्यातील पिवळय़ा व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना लेक लाडकी या योजनेचा लाभ मिळणार आहे. 
  2. सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण निश्चित करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक या निर्णयानूसार जलविद्युतमध्ये येणार आहे.
  3. सांगली,अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये स्थापण करण्यात येणार आहे.
  4. पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार हा महत्वपूर्ण निर्णय मंञीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
  5. फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्यात येणार आहे.
  6. भोसला मिलिटरी स्कूल साठी नागपूर येथे जमीन देण्यात येणार आहे.
  7. विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. Goverment Decisions

अशाप्रकारे हे महत्त्वाचे सात निर्णय दिनांक 10/10/2023 रोजीच्या मंञीमंडळ बैठकीत घेण्यात आले असून या निर्णयाचा लाभ नक्कीच राज्यातील जनतेला होणार आहे.

तर ही होती राज्य शासनाच्या  मंञीमंडळ बैठकी विषयीची माहीती.

 "Government Dicisions" हा लेख तूम्हाला आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments