Health improvement in maharashtra औषध तूटवड्यामूळे नांदेड, ठाणे, व छञपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेमूळे राज्य सरकार वर आरोग्य यंञणेच्या सूविधा बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दबाव होता या पार्श्वभूमीवर मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी मंञालयात आढावा बैठक घेऊन बैठकीमध्ये आरोग्य सूविधा बाबत अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून सन 2035 पर्यंत आरोग्य व वैद्यकीय शिक्षणाचे व्हिजन तयार करण्याची सूचना मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी दिली या बाबतची सविस्तर माहीती खालीलप्रमाणे.
आरोग्य यंञणेचा कायापालट करणार मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांची घोषणा Health Department improvement.
औषध तूटवड्याबाबत व इतर आरोग्य प्रश्ना बाबत राज्य सरकार वर टीका होत होती या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. 'Health Department Improvement'
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनीही आरोग्यावरील गुंतवणूक, पदभरती या महत्वपूर्ण प्रश्नाबाबत सूचना केल्या.
या बैठकीला आरोग्य मंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
नवीन सुविधायुक्त जिल्हा रुग्णालये उभारण्याबाबतचा आराखडा पंधरा दिवसांत सचिवांच्या समितीने तयार करावा आणि २०३५ पर्यंत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून राज्यासाठी आरोग्याचे एक सर्वंकष ' धोरण (व्हिजन) ' तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात यावी अशी महत्वाची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली असून 2035 पर्यंत आरोग्य यंञणेचा संपूर्ण कायापालट करण्याचा राज्य शासनाचा उद्देश असल्याची घोषणाच मूख्यमंञी यांनी या वेळी केली असून राज्यातील जनतेला आरोग्य सूविधेच्या बाबतीत दिलासा मिळण्याची व अधिक चांगल्या सूविधा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आढावा बैठकीत मूख्यमंञी यांच्या अध्यक्षतेखाली खालील महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
- 25 जिल्ह्यांमध्ये नवीन अद्ययावत 25 जिल्हा रुग्णालये उभारणे बाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
- 'वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडलेल्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. Health department improvement
- १४ जिल्ह्यातील महिलांच्या रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.
- मोठय़ा शस्त्रक्रियांसाठी राज्यातील जिल्हा रुग्णालयांत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
- प्राथमिक उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालये सक्षम करणे बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
- 'आरोग्य खर्चामध्ये भरीव वाढ व सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीला वेग देण्या संदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्य सूविधे बाबत महत्वाचे निर्देश
जिल्हा नियोजनमधून औषध खरेदीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी वेळ न गमावता आपापल्या ठिकाणी रुग्णालयांत लागणारी औषधे, वैद्यकीय उपकरणे दरपत्रकानुसार तत्काळ खरेदी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
तसेच वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवीन परिमंडळे निर्माण करणे, आरोग्यावरील खर्च वाढविणे, आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक आली पाहिजे यासाठी प्रयत्न करणे त्याचप्रमाणे वित्त आयोगाने दिलेला निधी पुढील मार्चपर्यंत खर्च झाला पाहिजे असे महत्त्वाचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले असून महाराष्ट्र शासन राज्यातील जनतेच्या आरोग्या बाबत कटीबद्ध असल्याचे या वरून दिसून येते.
0 Comments