एशियन गेम्स मध्ये भारताची नेत्र दीपक कामगिरी

India winning performance in Asian games
India winning performance in Asian games

India winning performance in Asian games मिञांनो नवीन आर्टीकलमध्ये आपले स्वागत आहे. 
आम्ही महायोजना मराठी या आमच्या ब्लॉग मध्ये लेटेस्ट  मराठी बातमी, शासन योजना, नोकर भरती, आरोग्य, टेक्नॉलॉजी, शासन निर्णय, इत्यादी विषयी वेळोवेळी महत्वपूर्ण बातमी देत आसतो त्यामूळे यासर्व विषया संदर्भातील माहीती जाणून घेण्यासाठी नक्की आमच्या mahayojana marathi website ला वेळोवेळी भेट द्या तूम्हाला वरील सर्व विषया संदर्भात व मराठी न्यूज संदर्भातील महत्वपूर्ण माहीती मिळत राहील.

तर या आर्टीकलमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत एशियन गेम्स विषयीची लेटेस्ट न्यूज सध्या चीन मध्ये एशियन गेम्स चालू आहेत एशियन गेम्स मध्ये भारत दररोज नवीन कामगिरी करत आहे एशियन गेम्स मध्ये भारताची पदके जिंकण्याची मालिका सूरूच आहे जाणून घेऊ या विषयी अधिक माहीती.

 एशियन गेम्स मध्ये भारताची नेत्र दीपक कामगिरी.

चीन मध्ये सूरू असलेल्या एशियन गेम्स मध्ये भारत दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे.

एशियन गेम्स मध्ये भारत दररोज पदकाची कमाई करत आहे. 'India winning performance in Asian games' भारताने आतापर्यंत 13 सूवर्ण पदकासह एकूण 60 पदकाची कमाई केली असून भारताची ही कामगिरी नेञदीपक आहे.

 भारत पदक तालिकेत सध्या चीन, जापान, दक्षिण कोरीया नंतर चौथ्या स्थानावर आहे.

कोणाला कीती पदके

चीन मध्ये सूरू असलेल्या 2023 च्या एशियन गेम्स मध्ये चीन हा देश पहिल्या क्रमांकावर आहे.चीनने एकूण 270 पदकासह  सर्वोत्कृष्ठ कामगिरी केली आहे.

तर जपान दूसऱ्या क्रमांकावर असून जपानने आतापर्यंत एकूण 122 पदके जिंकली आहेत 

तर दक्षिण कोरीया तिसऱ्या क्रमांकावर आहे दक्षिण कोरीयाने एशियन गेम्स मध्ये आतापर्यंत 31 सूवर्ण, 39 रौप्य तर 63 कास्य पदकासह एकूण 133 पदके जिंकली आहेत.

एशियन गेम्स मध्ये भारत पदक तालिकेत चौथ्या क्रमांकावर असून भारताने चीन जपान दक्षिण कोरीया नंतर एशियन गेम्स मध्ये नेञदीपक कामगिरी केली आहे. India winning performance in Asian games भारताने आतापर्यंत एशियन गेम्स मध्ये 13 सूवर्ण पदके पटकावली आहेत तर 24 रौप्य आणी 23 कास्य पदकासह एकूण 60 पदके पटकावली आहेत.

भारता नंतर तैपेई या देशाचा क्रमांक लागतो तैपेईने 12 सूवर्ण 10 रौप्य 17 कास्य पदकासह एकूण 39 पदके जिंकली आहेत.

एशियन गेम्स मध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी.

एशियन गेम्स मध्ये भारतीय खेळाडूनी चांगली कामगिरी केली असून भारताने आतापर्यंत एकूण 60 पदके जिंकली आहेत तर यामध्ये 13 सूवर्ण पदके जिंकली आहेत ही कामगिरी कौतूकास्पद आहे.

बीडचा भूमिपूञ असलेल्या अविनाश साबळे याने एशियन गेम्स मध्ये 3 हजार मीटर स्टीपलचेज या प्रकारात गोल्ड मेडल जिंकले या प्रकारात भारताचे हे पहिलेच गोल्ड मेडल असून या प्रकारामध्येभारताला पहिले गोल्ड मेडल जिंकवून देण्याचा बहूमान बीड जिल्ह्याचा भूमिपूञ असलेल्या मराठमोळ्या अविनाश साबळेने मिळविला आहे. अविनाशने अतिशय चांगली कामगिरी केली असून त्याची धावगती खूपच उत्कृष्ट होती 3 हजार मीटर स्टीपलचेज या खेळाच्या प्रकारात धावत असताना त्याच्या आसपासही कूणी नव्हते अविनाशने एकतर्फी विजय मिळवत सूवर्ण पदक पटकावले त्याने या रेकॉर्ड ब्रेक कामगिरीसह अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले.

तर रिक्षा चालकाची मूलगी असलेल्या भारताच्या केरळ मधील ॲन्सी सोजन एडाप्पिल्ली हीने महिलांच्या लांब उडीत विक्रमी कामगिरी करत 6.56 मीटर एवढी लांब उडी मारून रौप्य पदक जिंकले. तिने चीनच्या शीकी झिआँगला कडवी झूंज दिली शीकी झिआँगने 6.73 मीटर लांब उडी मारून सूवर्ण पदक जिंकले.

त्याचप्रमाणे भारताच्या तेजिंदर पालसिंग तूर याने सूवर्णमय कामगिरी करत गोळाफेक या क्रिडा प्रकारामध्ये पहिल्या स्थानावर झेप घेत भारताला सूवर्ण पदक मिळवून दिले.

तर ४०० मीटर मिश्र रिले शर्यतीत भारताने रौप्य पदक पटकावले यावेळी नाट्यमय घडामोड पहायला मिळाली ४०० मीटर मिश्र रिले शर्यतीत भारताने ३ मिनिटे १४.४३ सेंकदामध्ये अंतर पार करून तिसरे स्थान पटकावले श्रीलंका दूसऱ्या तर बहरीन पहिल्या स्थानावर होते परंतु अंतिम रेषा पार करत असताना भारतीय खेळाडू व श्रीलंकन खेळाडू यांच्यात खूप कमी अंतर राहिले होते त्याचवेळी अचानक श्रीलंकेच्या खेळाडू कडून चूक झाली आणि तिने आपला पाय दूसऱ्या लेन मध्ये टाकला त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला अपात्र घोषीत करण्यात आले आणि भारताला रौप्यपदक विजेता घोषीत करण्यात आले अशाप्रकारे भारताने ४०० मीटर मिश्र रिले प्रकारात रौप्य पदक पटकावले. चौथ्या स्थानावर असलेल्या कझाकिस्तानच्या संघाला कांस्यपदक मिळाले.

भारताने आतापर्यंत एकूण 13 सूवर्णमय पदकांची कमाई केली असून भारताने 2023 च्या या एशियन गेम्स मध्ये पहिले सूवर्ण पदक पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत जिंकले होते. यामध्ये भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार यांनी नेञदीपक कामगिरी करत 2023 च्या एशियन गेम्स मध्ये भारताला पहिले सूवर्ण पदक जिंकवून देत सूवर्ण पदक जिंकण्याची सूरवात करून दिली होती.

अशाप्रकारे भारत एशियन गेम्समध्ये विविध क्रिडा प्रकारामध्ये नेञदीपक कामगिरी करत आहे.

या एशियन गेम्स मध्ये भारत आणखी पदके पटकावण्याची दाट शक्यता आहे या बाबतची अपडेट आम्ही तूम्हाला देण्याचा  नक्कीच प्रयत्न करू

तर ही होती एशियन गेम्स मधील भारताच्या कामगिरी विषयीची उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देणारी महत्वपूर्ण घडामोड व माहीती. 
"India winning performance in Asian games" ही माहीती तूम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments