Maha Arogya Shibir Maharashtra केंद्र शासन व राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना उपक्रम राबवित असते.
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आहे या सरकारने सुद्धा महिलांना प्रवासामध्ये 50% सूट, आनंदाचा शिधा, शासकीय रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य सेवा, शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा, यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत.
याच प्रमाणे आता महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे चला तर मग जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.
Maha Arogya Shibir Maharashtra
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महायुतीचे सरकार आहे या सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत.
तसेच राज्य शासनाच्या विविध विभागा मार्फत योजना, मोहीम, उपक्रम, राबविण्यात येत आहेत याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागामार्फत महाआरोग्य शिबीर हा उपक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत आहे.
या उपक्रम अंतर्गत आषाढी वारीसाठी राज्यभरातून व देशातून पंढरपूर येथे आलेल्या नागरीकांसाठी महाआरोग्य शिबीराचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते या महाआरोग्य शिबिराचा लाभ पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी आलेल्या हजारो नागरिकांनी घेतला होता. 'Maha Arogya Shibir Maharashtra'
आता शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाआरोग्य शिबिराचा लाभ राज्यातील नागरिकांनी घ्यावा आरोग्यमंत्री व जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेचे अवाहन.
आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे राज्यातून व देशातून आलेल्या हजारो नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला होता.
तसेच महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य विभागाने पंढरपूर येथे आलेल्या नागरिकांची आरोग्य समस्या सोडवली होती व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविली होती.
आता याच धर्तीवर नवरात्र उत्सवा निमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या महाआरोग्य शिबिराचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.
तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी ही राजपत्रित अधिकारी यांची संघटना कार्यरत आहे या संघटनेमध्ये राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी गट अ संवर्गातील अधिकारी यांचा समावेश आहे या संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष तथा आरोग्य सेवा परिमंडळ पुणे चे उपसंचालक डॉ. आर. बी. पवार यांनी या महाआरोग्य शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
महाआरोग्य शिबिराचा उद्देश
दरवर्षी नवरात्र उत्सवा निमित्त लाखो भावीक तुळजापूर येथे संबंध महाराष्ट्रातून दर्शनासाठी दाखल होत असतात.
तुळजापूर येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची आरोग्याची समस्या होऊ नये व त्यांना तातडीने वेळेत औषधोपचार व तपासणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने उत्सव नवरात्रीचा महाराष्ट्राच्या आरोग्याचा या संकल्पनेवर आधारित महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. Maha Arogya Shibir Maharashtra
या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून उपचाराची सुविधाही मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या आरोग्य सुविधांचा मिळणार लाभ
- हाडांची तपासणी
- डोळ्यांची तपासणी
- कान, नाक, घसा, तपासणी
- कर्करोग तपासणी
- स्त्रिया व बालके यांची तपासणी
- रक्तक्षय तपासणी
- हृदयरोग व इसीजी तपासणी
- मेंदूची तपासणी
- दंतरोग तपासणी
- मूत्रपिंड विकार तपासणी
- मोफत आयुष उपचार
- मोफत औषधी वितरण
- मोफत चष्मा वाटप
इत्यादी आरोग्य सुविधांचा लाभ तुळजापूर येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबिरामध्ये राज्यातील नागरिकांना मिळणार आहे.
महाआरोग्य शिबिराचे ठिकाण व दिनांक
उत्सव नवरात्रीचा महाराष्ट्राच्या आरोग्याचा या संकल्पने वर आधारित महाआरोग्य शिबिराची सुरुवात दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.
हे शिबिर दिनांक 27 ऑक्टोबर 2023 ते दिनांक 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये घाटशीळ पायथा सोलापूर रोड तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे आयोजित केले जाणार आहे.
या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तर ही होती तुळजापूर येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबिराची सविस्तर माहिती.
तुम्हाला "Maha Arogya Shibir Maharashtra" हा लेख आवडला असेल व तुम्ही हा लेख इतर लोकांसोबत त्यांना फायदा होण्याच्या दृष्टीने नक्कीच शेअर कराल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments