मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाच्या योजने विषयी आम्ही या लेखामध्ये आपल्याला माहिती उपलब्ध करून देणार आहोत या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना ही योजना पूर्णपणे राज्य पुरस्कृत योजना असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात राबविली जाते जाणून घेऊ या योजने विषयी सविस्तर माहिती.
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना
100% राज्य पुरस्कृत असलेली ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जाते. 'Maharashtra Krishi yojana'
- शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे.
- उत्पादित मालास ग्राहकांची पसंती, बाजारपेठ निर्माण करणे, व निर्यातीस प्रोत्साहन देणे.
- ग्रामीण भागात लघु व मध्यम अन्नप्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेचे लाभ
- या योजनेअंतर्गत कृषी व अन्न प्रक्रियांचे नवीन प्रकल्प उभारणी करण्यासाठी व कार्यरत असलेल्या कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांचे स्तर वृद्धी, विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येते.
- मूल्यवर्धन शीतसाखळी आणि साठवणुकीच्या पायाभूत सुविधा या बाबींचा सुद्धा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला असून या योजनेअंतर्गत या बाबीसाठी सुद्धा शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येते. Maharashtra Krishi yojana
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत पात्र उद्योग व पात्र लाभार्थींना कारखाना, सयंत्रे आणि प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक असणारे दालने यांच्या बांधकाम खर्चाच्या 30 % अनुदान देण्यात येते अनुदानाची कमाल मर्यादा 50 लाख रुपयापर्यंत आहे.
मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्हा व तालुक्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा.
योजनेसाठी पात्र उद्योग व लाभार्थी.
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी खालील नमूद उद्योग पात्र आहेत.
अन्नधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबिया, मसाले, नगदी पिके, मूल्यवर्धन शीतसाखळी आणि साठवणुकीच्या पायाभूत सुविधा, पीक आधारित अन्नप्रक्रिया उद्योगाशी निगडित काढणी पश्चात पूर्व प्रक्रिया केंद्र व एकात्मिक शीतसाखळी केंद्र हे उद्योग या योजनेसाठी पात्र आहेत.
वैयक्तिक लाभार्थी, वैयक्तिक उद्योजक, सक्षम शेतकरी, बेरोजगार युवक, महिला उद्योजक, अग्रिगेटर, भागीदारी प्रकल्प, भागीदारी संस्था.
शेतकरी, उत्पादक गट / संस्था, कंपनी, स्वयंसहायता गट, उत्पादक सहकारी संस्था, शासकीय संस्था, खाजगी संस्था.
अशा प्रकारे या पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री कृषी अन्नप्रक्रिया योजनेचा लाभ घेता येतो.
तर ही होती मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेची महत्त्वपूर्ण माहिती.
0 Comments