Maharashtra Yojana इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना ही महत्त्वाची योजना असून या योजनेचा लाभ अनेक अपंगत्व असलेल्या लोकांना मिळतो.
या योजनेची माहिती अपंगत्व असलेल्या लोकांना व्हावी या उद्देशाने मी हा लेख लिहीत असून जाणून घेऊ या योजनेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करावा, अर्ज करण्याची पद्धत, व किती रुपये लाभ मिळतो याची सविस्तर माहिती.
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्रता
या योजनेसाठी खालील लाभार्थी पात्र आहेत.
18 ते 79 वयोगटातील 80% पेक्षा जास्त अपंगत्व असलेले व बहू अपंगत्व असलेले नागरिक या योजनेसाठी पात्र असून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. Maharashtra Yojana
इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- वयाचा दाखला - किमान 18 ते 79 वर्षे वय 18 पेक्षा कमी असल्यास पालकांमार्फत लाभ मिळतो.
- रहीवाशी प्रमाणपञ - किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असले बाबतचे प्रमाणपत्र.
- किमान 80% अपंगत्व असले बाबतचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र
- दारिद्रय रेषेखालील प्रमाणपञ ( कूटूंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारीद्रय रेषेखालील कूटूंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे )
- आधार कार्ड,
- राशन कार्ड,
- मतदान कार्ड,
- बँक पासबुक झेरॉक्स,
- अर्जदाराचा फोटो.
लाभार्थ्यांना किती रुपये मिळतो लाभ
इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज केल्यानंतर व केलेला अर्ज मंजूर झाल्यानंतर या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना पूर्वी दरमहा 1000 रूपये लाभ मिळत होता परंतु आता दिनांक 5 जूलै 2023 च्या शासन निर्णयानूसार दरमहा 1500 रुपये सूधारीत अर्थसहाय्य मिळते यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा 300 रूपये आहे तर राज्य शासनाचा हिस्सा 1200 रूपये आहे.
तर ही होती इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने विषयीची महत्त्वाची माहिती. "Maharashtra Yojana"
तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो व तसेच तुम्ही हा लेख गरजू लोकांपर्यंत त्यांना फायदा होण्याच्या दृष्टीने नक्कीच शेअर करा धन्यवाद.
0 Comments