बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाची निवड यादी प्रसिद्ध Mpw Vacancy Selection List

Mpw Vacancy Selection List
Mpw Vacancy Selection List

Mpw Vacancy Selection List राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी झालेल्या नोकर भरतीचा निकाल लागला असून पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती.

M.P.W. या पदाची निवड यादी प्रसिद्ध.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 15 व्या वित्त आयोग अंतर्गत बीड येथे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) ही पदे भरण्यासाठी दिनांक 24/05/2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 'Mpw Vacancy Selection List'

या जाहिराती नुसार प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आली होती अर्जाची छाननी केल्यानंतर 105 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. 

 या पात्र ठरलेल्या 105 उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय बीड येथे हजर राहण्यासाठी बोलवण्यात आले होते परंतु दोन वेळा संधी देऊनही फक्त 56 उमेदवारांनी कागदपञे पडताळणी साठी सादर केली होती व हे कागदपत्र सादर केलेले 56 उमेदवार मूळ कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरले होते या पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक 15/9/2023 ते 25/9/2023 या कालावधी मध्ये मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात येऊन अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. Mpw Vacancy Selection List

कीती उमेदवारांची झाली निवड

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने झालेल्या या नोकर भरतीसाठी एकूण 27 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. 

 खुल्या प्रवर्गासाठी 11 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी - 3, अनुसूचित जमाती -2, विमुक्त जाती (अ)-1, भटक्या जमाती (क) - 1, भटक्या जमाती (ड) -1, इतर मागासवर्ग -5, EWS - 3, असे एकूण 27 प्रवर्ग निहाय पदांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

निवड झालेल्या उमेदवारांची यादी येथे क्लिक करा.

तर ही होती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत MPW या पदासाठी झालेल्या नोकर भरती विषयीची सविस्तर माहिती व या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नावाची यादी.

तुम्हाला "Mpw Vacancy Selection List" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.

आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी कृती दल स्थापन Amba pik kid niyantran upay yojana

Post a Comment

0 Comments