Pradhan Mantri Fasal Bima Yojana मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा योजना या महत्त्वाच्या योजनेविषयी आम्ही या आजच्या लेखामध्ये तुम्हाला माहिती उपलब्ध करून देणार आहोत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना ही केंद्रशासन पुरस्कृत योजना असून ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी विभागा मार्फत राबविली जाते या योजनेचा लाभ राज्यातील अनेक शेतकऱ्यांना होतो.
चला तर मग जाणून घेऊ या महत्त्वाच्या योजने विषयी अधिक माहिती.
प्रधानमंत्री पिक विमा योजना एक रुपया मध्ये घ्या या योजनेचा लाभ.
प्रधानमंत्री पिक विमा योजना या योजनेमुळे शेतकऱ्यांना विमा संरक्षण प्राप्त झालेले आहे.
खरीप व रब्बी हंगामा करिता खालील जोखमीच्या बाबी करीता प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत मिळते विमा संरक्षण.
- प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. Pradhan Mantri Fasal Bima Yojana
- पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान.
- पीक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, शेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग, संततधार इत्यादी बाबीमुळे व कारणामुळे उत्पन्नात येणारी घट.
- स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान.
- नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान.
तर मित्रांनो अशा प्रकारे या जोखमीच्या बाबी करिता प्रधानमंत्री पिक विमा योजना या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळतो व पिकांचे झालेले नुकसान भरून निघण्यास मदत होते.
प्रधानमंञी पीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्र
- आधारकार्ड
- पीक पेरा अहवाल
- सात बारा उतारा
- आठ अ उतारा
- बँक पासबूक
- आधार लिंक मोबाईल नंबर
तर ही कागदपत्रे प्रधानमंञी पीक विमा योजना या योजने अंतर्गत नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहेत.
पिक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याची व पिक विमा भरण्याची पद्धत.
- आता शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून या योजनेसाठी नोंदणी करता येते.
- शेतकरी स्वतः ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- त्याचप्रमाणे बँक, सामूहिक सेवा केंद्र (C.S.C.) विमा कंपनी प्रतिनिधी, यांच्यामार्फत सुद्धा नोंदणी करता येते व पिक विमा योजनेचा लाभ घेता येतो.
अशा प्रकारे फक्त एक रुपया भरून तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.
तर मित्रांनो ही होती प्रधानमंत्री पिक विमा योजने विषयीची महत्त्वपूर्ण माहिती.
तुम्हाला "Pradhan Mantri Fasal Bima" Yojana हा लेख आवडला असेल व तुम्ही हा लेख इतर लोकांसोबत नक्कीच शेअर कराल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments