Pradhan Mantri TB Mukt Bharat Abhiyan

Pradhan Mantri TB Mukt Abhiyan
Pradhan Mantri TB Mukt Abhiyan

Pradhan Mantri TB Mukt Bharat Abhiyan केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या अभियाना विषयी आम्ही या लेखांमध्ये माहिती उपलब्ध करून देणार आहोत ते म्हणजे प्रधानमंञी टीबी मूक्त भारत अभियान या अभियाना नूसार सन 2025 पर्यंत भारत टीबी मूक्त करण्याचे केंद्र शासनाचे ध्येय आहे.

 टीबी म्हणजे क्षयरोग हा गंभीर आजार आहे हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे इतर सामान्य लोकांनाही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते वेळेत लक्ष देऊन उपाययोजना, टेस्ट व औषधोपचार न केल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवून टीबी मुक्त भारत करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियान सुरू केले आहे.

 जाणून घेऊ या विषयी अधिक माहिती.

 Pradhan mantri TB Mukt Bharat Abhiyan

टीबी हा संसर्गजन्य आजार मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्यूलोसिस या बॅक्टेरिया मुळे होतो. 

टीबी पॉझिटिव रूग्ण जेव्हा थूंकतात, बोलतात किंवा शिंकतात तेव्हा हा आजार हवेद्वारे एका टीबी पॉझिटिव्ह व्यक्तीकडून दुसऱ्या सामान्य व्यक्तीमध्ये पसरतो त्यामुळे त्या सामान्य व्यक्तीला ही टीबीची लागण होते.

अशा प्रकारे हा संसर्गजन्य रोग असून या रोगाचे सन 2025 पर्यंत देशातून संपूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री टिबी मुक्त अभियान सुरू केले आहे. 'Pradhanmantri TB Mukt Bharat Abhiyan' या अभियान अंतर्गत सन 2025 पर्यंत देशातील प्रत्येक ग्रामपंचायत टीबी मुक्त करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे हे अभियान यशस्वी करण्यासाठी केंद्र शासनाला सेवाभावी संस्था एनजीओ मदत करत असतात.

टीबी ची लक्षणे.

  • दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला येणे.
  • संध्याकाळी वाढणारा ताप व घाम येणे.
  • भूक मंदावणे.
  • वजनात लक्षणिय घट होणे.
  • छातीमध्ये दुखणे.
  • थुंकीतून रक्त येणे.
  • मानेवर गाठी येणे.

ही क्षयरोगाची लक्षणे असून अशा प्रकारची कोणतेही लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे जाऊन तपासणी व निदान करावे या ठिकाणी रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येते व औषधोपचारही संपूर्णपणे मोफत करण्यात येतो. 

त्यामुळे टीबी ची लक्षणे असलेल्या रुग्णांनी कोणत्याही प्रकारची काळजी न करता जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व औषधोपचार करून घ्यावा. Pradhan mantri TB Mukt Bharat Abhiyan

प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाची उद्दिष्टे

  • क्षयरोग जनजागृती व लोकसहभाग वाढवणे.
  • क्षयरोग लवकर निदान व पूर्ण उपचार करणे.
  • क्षयरोग तपासणीला प्रोत्साहन देणे.
  • क्षयरोग रुग्ण आणि कुटुंबासाठी अतिरिक्त मदत.
  • क्षयरोग लक्षणे असलेल्या रुग्णास चाचणी करण्यासाठी  प्रवृत्त करणे.
  • क्षयमुक्त स्थितीच्या मूल्यांकनानुसार ग्रामपंचायतीस पारितोषिक देणे.
  • सन 2025 पर्यंत भारत टीबी मुक्त करणे.

टीबी रुग्णांना मिळणारे लाभ

  • प्रत्यक्ष रुग्णाला उपचार पूर्ण होईपर्यंत प्रति माह रुपये 500 इतके अनुदान पोषण आहारा करीता रुग्णांच्या बँक खात्यावर जमा केले जाते.
  • क्षय रुग्ण बरा होईपर्यंत पूर्ण औषधोपचार मोफत करण्यात येतो.
  • रक्त लघवी थूंकी व इतर तपासण्या मोफत करण्यात येतात.
  • एक्स-रे तपासणी ही मोफत करण्यात येते.

अशा प्रकारे प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियान देशामध्ये सुरू असून सन 2025 पर्यंत भारत टीबी मुक्त करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे.

तर टीबीची लक्षणे असलेल्या व्यक्तींना शासनाच्या मोफत तपासणी व औषधोपचार या योजनेची माहिती व्हावी या उद्देशाने मी हा लेख लिहिला असून तुम्हाला "Pradhan Mantri TB Mukt Bharat Abhiyan" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments