Talathi Bharti संदर्भात महत्त्वाची बातमी आहे तलाठी भरती संदर्भात आक्षेप हरकती नोंदविण्याकरिता आज दिनांक 8/10/2023 रोजी शेवटची तारीख आहे.
तसेच आक्षेप हरकती नोंदविल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाने घेतलेल्या तलाठी परीक्षेचे नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे परीक्षेचे Normalization केल्यानंतर राज्याची मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
याबाबत भूमी अभिलेख कार्यालयाने प्रसिद्धी पत्रक काढले आहे जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.
तलाठी भरती संदर्भात आक्षेप हरकत घेण्यासाठी आज शेवटची तारीख.
'Talathi Bharti' महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी गट क या पदाकरिता पद भरतीची जाहिरात दिनांक 26/6/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती व या तलाठी पद भरती करिता दिनांक 17/8/2023 ते दिनांक 14/9/2023 या कालावधीमध्ये एकूण 19 दिवसांमध्ये एकूण 57 सञामध्ये परीक्षा घेण्यात आली होती तर दिनांक 28/9/2023 रोजी पासून उमेदवारांना त्यांचे लॉगिन आयडीवर Answer key उपलब्ध करून देण्यात आलेली आहे उमेदवारांना उपलब्ध करून दिलेल्या Answer key संदर्भात answer key मधील प्रश्न चुकीचा असल्यास किंवा प्रश्नामधील पर्याय चुकीचे असल्यास इत्यादी बाबत आक्षेप हरकती असल्यास आक्षेप हरकत नोंदविण्याकरिता आज शेवटची तारीख आहे.
परीक्षे संदर्भात आक्षेप हरकत घेण्या करीता लिंक खूली
आज दिनांक 8/10/2023 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत Talathi Bharti प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या टीसीएस कंपनीकडून लिंक खूली करून देण्यात आलेली आहे सदरील लिंक वर सादर करण्यात आलेल्या आक्षेप / हरकती बाबत टीसीएस समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे जर नोंदवलेली आक्षेप हरकत योग्य असेल तर सदर प्रश्नाबाबत गुण देण्या बाबत धोरण निश्चित करण्यात येणार आहे.
टीसीएस कंपनीकडून आक्षेप हरकत सादर करण्यासाठी प्रति आक्षेप हरकत साठी शंभर रुपये फी आकारण्यात येईल नोंदवलेले आक्षेप हरकत योग्य असल्यास फी परत करण्यात येईल आणि जर अयोग्य असेल तर फी परत मिळणार नाही असे भूमी अभिलेख कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट नमूद केले आहे.
कधी लागणार तलाठी भरतीचा निकाल
तलाठी भरतीची परीक्षा राज्यामध्ये एकूण 57 सञामध्ये घेण्यात आलेली आहे या 57 सञाचे काठीण्य पातळीचे समीकरण (नॉर्मलायझेशन) करण्यात येणार आहे नॉर्मलायझेशन केल्यानंतर उमेदवारांचे गुण निश्चित करून राज्याची मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती भुमिअभिलेख कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रका मार्फत देण्यात आलेली आहे.
0 Comments