Yojana for Senior Citizens |
Yojana for Senior Citizens महाराष्ट्र राज्यामध्ये वृद्ध व्यक्तींसाठी महत्त्वाची योजना चालू आहे या योजनेचे नाव आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना.
या योजनेचा लाभ ६५ वर्षे पेक्षा जास्त वय असलेल्या निराधार वृद्धांना मिळतो चला तर मग जाणून घेऊ या योजने विषयी सविस्तर माहिती.
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
महाराष्ट्र राज्यामध्ये 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या निराधार वृद्ध व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येते. 'Yojana For senior Citizens'
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील वृद्ध निराधार नागरिकांना त्यांच्या मूलभूत दैनंदिन गरजा भागविता येणे हा आहे.
यासाठी त्यांना या योजने अंतर्गत दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येते. राज्यातील वृद्ध निराधार व्यक्तींना योजनेची माहिती व्हावी व त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी मी हा लेख लिहीत असून या लेखांमध्ये आम्ही या योजने विषयीची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देणार आहोत.
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आवश्यक पात्रता व कागदपत्रे
या योजनेसाठी 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेले निराधार स्त्री पुरुष वृद्ध नागरिक पात्र आहेत. Yojana for Senior Citizens
- विहित नमुन्यातील अर्ज.
- वयाचा दाखला किमान 65 वर्षे वय असले बाबत वयाचे प्रमाणपत्र.
- रहिवासी प्रमाणपत्र किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असले बाबतचे प्रमाणपत्र.
- दारिद्र रेषा प्रमाणपत्र दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र नसल्यास वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपये पर्यंत असले बाबतचे उत्पन्न प्रमाणपत्र.
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- मतदान कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- अर्जदाराचा फोटो
इत्यादी कागदपञे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी आवश्यक आहेत.
पात्र लाभार्थ्यांना किती रुपये मिळतो लाभ.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा
आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालय व सेतू केंद्र येथे अर्ज करावा लागेल तेथील कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांना अर्ज करून देतील.
तर ही होती श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेविषयीची महत्त्वपूर्ण माहिती "Yojana for Senior Citizens" हा लेख तुम्हाला आवडला असेल व तुम्ही हा लेख इतर गरजू लोकांपर्यंत नक्कीच शेअर कराल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments