हातमाग विणकरासाठी बक्षीस योजना सुरू 20000 रुपयांपर्यंत मिळणार बक्षीस शासनाचा निर्णय

Prize Yojana for Weavers
Prize Yojana for Weavers

पारंपारिक वस्त्र उद्योग क्षेत्रातील विणकरांसाठी शासनाने बक्षीस योजना सुरू केली असून या बाबतचा शासन निर्णय दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केला आहे.
या योजने नुसार विणकरांना वीस हजार रुपयांपर्यंत बक्षीस मिळणार आहे.
जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.

पारंपारिक वस्त्र उद्योग क्षेत्रातील विणकरांसाठी शासनाची बक्षिस योजना

महाराष्ट्र शासनाने पाच पारंपारिक वस्त्र उद्योग क्षेत्रातील विणकरांसाठी बक्षिस योजना सूरू केली आहे.

 या योजने नुसार विणकरांना 20 हजार रुपयांपर्यंत बक्षिस मिळणार आहे. 'Prize Yojana for Handloom weavers'

राज्यातील १) पैठणी साडी २) हिमरू शालू ३) करवत काटी ४) घोंगडी ५) खण फॅब्रिक या पाच पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने बक्षीस योजना सुरू केली आहे.

 महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग वाढीला चालना देण्यासाठी व वस्त्रोद्योगाला आवश्यक त्या उपायोजनाना हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन 2023 पासून पुढील पाच वर्षाच्या कालावधी करिता एकात्मिक व शाश्वत वस्त्र उद्योग धोरण 2023 ते 2028 जाहीर केलेले आहे या धोरणामधील तरतुदीनुसार राज्य शासनाने पाच पारंपारिक वस्त्र उद्योग क्षेत्रातील विणकरासाठी बक्षीस योजना सुरू केली आहे.

 योजनेचे स्वरूप 

महाराष्ट्र राज्यातील पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांचा सन्मान करण्यासाठी आणि सामाजिक व आर्थिक विकासात या क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी पारंपारिक वस्त्र उद्योग क्षेत्रातील विणकरांसाठी शासनाने 10 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार बक्षीस योजना सुरू केली आहे. Prize Yojana for Handloom Weavers

 या योजने अंतर्गत पाच पारंपारिक वस्त्र उद्योग १) पैठणी साडी २) हिमरू शालू ३)करवत काटी ४)घोंगडी ५)खण फॅब्रिक या वस्त्र उद्योग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट डिझाइन्सचा राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सत्कार केला जाईल.

 पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला अनुक्रमे रुपये 20000, रुपये 15000, आणि रुपये 10000 बक्षिस दिले जाणार असून सदरील बक्षीसाची रक्कम बक्षीस जिंकणाऱ्या पारंपारिक वस्त्र उद्योग विणकरांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणाली द्वारे थेट अदा करण्यात येईल.

 स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धक विणकरांना आयुक्त वस्त्र उद्योग यांच्या मार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

योजनेचे निकष

  • पारंपारिक वस्त्रांचे विणकाम करणारे सर्व विणकर / खाजगी सहकारी संस्था /  महामंडळ/ महासंघाचे स्वयंसेवी संस्था / गट सदरील स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
  • अर्जासोबत विणकाम करताना विणकराचा जिओ टॅगिंग फोटो सादर करणे आवश्यक आहे.
  • विणकर स्पर्धक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
हे बक्षीस योजनेचे महत्त्वाचे निकष आहेत.

पुरस्कार निवड करण्याची कार्यपद्धती

  • स्पर्धेत ठेवण्यात येणाऱ्या वाणाचा प्रकार पाच पारंपारिक वस्त्र उद्योग या पैकीच असावा.
  • निवड समिती प्रत्येक पारंपारिक वाणातून पहिले दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षीसासाठी वाणाची निवड करेल.
  • निवड समितीमधील प्रत्येक  सदस्यास एका वाणास दहापर्यंत गुण देण्याचे अधिकार असतील. 
  • एकूण गुणांच्या आकडेवारीच्या आधारे पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षीसासाठी निवड करण्यात येईल.
  •  सारखे गुण आल्यास समिती निर्णयानुसार एक बक्षीस दोन स्पर्धकांमध्ये विभागून देण्यात येईल.
  •  गुणांचे वाटप कापडावरील नक्षीकाम त्याची अचूकता रंग  संगती व कापडाची आकर्षकता यांच्या आधारे करण्यात येईल.

अशा प्रकारे स्पर्धकाची निवड करून पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. 

G.R वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 तर ही होती पाच पारंपारिक वस्त्र उद्योग क्षेत्रातील विणकारांसाठी बक्षीस योजने बाबतची सविस्तर माहिती. 

तुम्हाला "Prize Yojana for Handloom Weavers"  हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments