Bandhkam kamgar yojana |
Bandhkam kamgar shaikshnik yojana मित्रांनो या आर्टिकल मध्ये आम्ही बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देणार आहोत.
या आर्टिकल मध्ये बांधकाम कामगारांसाठी शासनाने सुरू केलेल्या बांधकाम कामगार शैक्षणिक योजनेविषयी महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊ या योजनेविषयी विषयी सविस्तर माहिती.
बांधकाम कामगार शैक्षणिक योजना Bandhkam Kamgar Shaikshnik Yojana
शासनाने महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक योजना सुरू केलेली आहे. 'Bandhkam kamgar shaikshnik yojana'
या योजने अंतर्गत अनेक विविध स्वरूपाचे लाभ बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळतात.
- बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत प्रति वर्ष रुपये 2500 प्रमाणे लाभ मिळतो.
- इयत्ता दहावी बारावी मध्ये 50% पेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये दहा हजार लाभ या योजनेअंतर्गत मिळतो.
- इयत्ता अकरावी व बारावीच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रति वर्ष रुपये दहा हजार लाभ या योजनेअंतर्गत मिळतो.
- पदवी अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रति वर्ष रुपये वीस हजार लाभ मिळतो.
- या योजनेअंतर्गत MS - CIT चे शिक्षण मोफत मिळते.
- वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रतिवर्षी रुपये 100000 लाभ मिळतो.
- तर अभियांत्रिकीच्या शिक्षणाकरिता रुपये 60000 लाभ मिळतो.
- शासनमान्य पदवी साठी प्रति वर्ष रुपये 20000 लाभ मिळतो.
- तर पदवीत्तर पदवीच्या शिक्षणासाठी प्रति वर्ष रुपये 25000 लाभ मिळतो.
अशा प्रकारे इत्यादी महत्त्वाचे लाभ या योजने अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळतात.
बांधकाम कामगार शैक्षणिक योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार शैक्षणिक योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खाली नमूद कागदपत्रे आवश्यक आहेत. Bandhkam kamgar shaikshnik yojana
- पाल्याचे शाळेचे ओळखपत्र
- शैक्षणिक वर्षांमध्ये 75% पेक्षा जास्त उपस्थिती असले बाबत हजेरीचा दाखला
- गुणपत्रिका
- मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय, अभियांत्रिकी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्मासाठी
- MS CIT उतीर्ण प्रमाणपत्र
इत्यादी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.
योजनेसाठी अर्ज कसा आणि कोठे करावा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो.
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळा द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार शैक्षणिक योजना ही खूप चांगली योजना असून या योजनेनुसार वरील प्रमाणे विविध स्वरूपाचे अनेक लाभ बांधकाम कामगारांच्या पाल्यांना प्राप्त होतात.
तर ही होती बांधकाम कामगार शैक्षणिक योजना विषयीची महत्त्वपूर्ण माहिती.
0 Comments