संत एकनाथ सचिन घायाळ साखर कारखाना पैठणचा ऊस दर जाहीर
जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी उसाचे दर जाहीर केले आहेत या पैकीच एक असलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील श्री संत एकनाथ सचिन घायाळ साखर कारखाना लिमिटेड पैठण या साखर कारखान्याने पहिल्या हप्त्यासाठीचा ऊसाचा दर जाहीर केला असून कारखाना पहिला हप्त्यासाठी रुपये 2705 प्रति टन ऊस दर देणार आहे हा ऊस दर सन 2023 - 2024 या चालू गळीत हंगामासाठी लागू असणार आहे.
कारखान्याने जाहीर केलेला ऊस दर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, व बीड जिल्ह्यामधील इतर साखर कारखान्यांनी जाहीर केलेल्या ऊस दरापेक्षा सर्वाधिक असल्याचा दावा श्री संत एकनाथ सचिन घायाळ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांनी केला आहे.
श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड पैठण हा कारखाना सचिन घायाळ शुगरने भाडे तत्त्वावर चालवण्यासाठी घेतला असून याबाबत अठरा वर्षाचा करार केलेला आहे.
सचिन घायाळ हे कामगार पूञ असून स्वतःच्या परीश्रमाच्या बळावर त्यांनी हा साखर कारखाना चालविण्यासाठी घेतला आहे.
सचिन घायाळ शूगरने या कारखान्यामध्ये अनेक बदल केले असून आत्याधुनिक यंत्रसामुग्रीद्वारे व कुशल मनुष्यबळ द्वारे कारखाना साखरेचे दर्जेदार उत्पादन करत आहे.
ऊसाच्या वजनामध्ये काटकसर करणार नाही कारखान्याची हमी.
- उसाच्या वजनामध्ये कोणत्याही प्रकारची काटकसर करणार नसून उसाच्या वजनामध्ये तफावत आढळल्यास रोख रुपये एक लाख बक्षीस देणार असल्याची घोषणा कारखाना प्रशासनाने केली आहे.
- काटा चोख पेमेंट ठोक असे घोषवाक्यच कारखान्याने प्रसिद्ध केले आहे. Sugarcane Rate Declared
- यानुसार जर विश्वास नसेल तर बाहेरील वजन काट्यावरून उसाचे वजन करून आणण्याची परवानगी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
- तसेच इतर साखर कारखान्याला जाणाऱ्या उसाचे मोफत वजन करून देऊन त्याची रीतसर पावती देण्याची सुविधा सुद्धा श्री संत एकनाथ सचिन घायाळ साखर कारखान्याने केली आहे.
शेतकऱ्यांनी श्री संत एकनाथ साखर कारखान्याला ऊस द्यावा चेअरमन सचिन घायाळ यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका हा सर्वाधिक ऊस उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो.
ऊस उत्पादनाच्या बाबतीत पैठण तालुका मराठवाड्यामध्ये अग्रेसर आहे.
येथील शेत जमीन ऊस उत्पादनासाठी पोषक आहे तसेच जायकवाडी धरणामुळे येथील बहुतांशी क्षेत्र सिंचना खाली आले आहे यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन घेतले जाते.
पैठण तालुक्यामध्ये स्थानिक दोन साखर कारखाने आहेत परंतु तालुक्यातून तब्बल 15 ते 18 साखर कारखाने ऊस घेऊन जातात येवढ्या प्रमाणात ऊस उत्पादन पैठण तालुक्यामध्ये घेतले जाते.
इतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस देण्यापेक्षा आपल्या हक्काच्या आपल्या तालुक्यातील श्री संत एकनाथ सचिन घायाळ साखर कारखान्याला ऊस द्या असे आवाहन चेअरमन सचिन घायाळ यांनी केले असून ऊसाच्या वजनामध्ये कोणतीही काटकसर करणार नसून सर्वाधिक ऊस दराची हमी सूद्धा दिली आहे.
तूम्हाला "Sugarcane Rate Declared" ही बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments