कॅप्टीव्ह मार्केट योजने नुसार दरवर्षी मिळणार मोफत साडी.
महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला मोफत साडी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू केली आहे. 'Captive Market Yojana'
या बाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक 10/11/2023 रोजी निर्गमित केला आहे.
हा शासन निर्णय राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आला असून कॅप्टीव्ह मार्केट योजने अंतर्गत मोफत साडी वाटप करण्याची व त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर सोपविण्यात आली आहे.
कोणाला मिळणार कॅप्टीव्ह मार्केट योजनेचा लाभ
- महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या सर्व कुटुंबांना कॅप्टीव्ह मार्केट योजने अंतर्गत दरवर्षी मोफत साडीचा लाभ मिळणार आहे. Captive Market Yojana
- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत महाराष्ट्र राज्यात अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांची संख्या 24 लाख 58 हजार 747 इतकी आहे.
- दरवर्षी अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे त्यांच्या संख्यानुसार या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत सुद्धा वाढ / घट होणार आहे.
- या योजनेचा लाभ राज्यातील लाखो अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना मिळणार आहे.
- वाटप करण्यात येणाऱ्या मोफत साडीचे उत्पादन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित नवी मुंबई यांच्यावर सोपविण्यात आली असून या संस्थेला नोडल संस्था म्हणून नेमण्यात आले आहे.
लाभार्थींना मोफत साडी कोठे आणि कधी मिळणार
- कॅप्टीव्ह मार्केट योजने अंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या लाभार्थीं कूटूंबांना मोफत साडी शासनाच्या वतीने दरवर्षी उपलब्ध होणार असून लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमधून साडी वितरित करण्यात येणार आहे.
- शासनाने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबांना दरवर्षी एक साडी रास्त भाव दुकानांमधून शासनाच्या वतीने वाटप करण्यात येणार आहे.
- मोफत साडी वाटप करण्याची कॅप्टीव्ह मार्केट योजना सन 2023 ते सन 2028 पर्यंत या पाच वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.
अशा प्रकारे मोफत साडीचा लाभ अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या महाराष्ट्र राज्यातील लाखो कुटुंबाला मिळणार आहे.
0 Comments