दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या भागांमध्ये राज्य शासनाकडून दुष्काळ घोषित सवलती केल्या लागू
या वर्षी महाराष्ट्र राज्याच्या काही भागांमध्ये अतिशय कमी पाऊस झाला आहे तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्या व्यतिरिक्त आणखी इतर तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. 'Government Declared Drought'
जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये कमी पर्जन्यमान झाल्याने या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या भागांमध्ये दुष्काळ घोषित करून या ठिकाणी सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 10/11/2023 रोजी निगमित केला आहे.
दुष्काळ घोषित केलेल्या भागांमध्ये खालील सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मीमी पेक्षा कमी झाले आहे अशा 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली असून त्या ठिकाणी खालील नमूद सवलती लागू करण्यात आल्या आहेत. Government Declared Drought
अशा प्रकारे दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये वरील महत्त्वाच्या सवलती राज्य शासनाने जाहीर केल्या आहेत.
दुष्काळ सदृश्य भागामध्ये उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर.
राज्य शासनाने दुष्काळ घोषित केलेल्या भागांमध्ये उपाययोजना व सवलती यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य शासनाने संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविली आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ज्या महसूली मंडळातील पर्जन्यमापक यंत्रे बंद होती अथवा नवीन महसुली मंडळे स्थापन केल्यामुळे त्या महसुली मंडळामध्ये पर्जन्यमापक यंञे अद्याप बसविली गेली नसतील अशा मंडळाची माहिती जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्ररीत्या शासनास सादर करणे बाबत जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाच्या वतीने सुचित करण्यात आले आहे.
सविस्तर शासन निर्णय व दुष्काळ घोषित केलेल्या भागाची यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तर अशा प्रकारे दुष्काळ घोषित झालेल्या भागामध्ये राज्य शासनाच्या वतीने सवलती मिळणार आहेत.
तर ही होती राज्य शासनाने दुष्काळ घोषित केलेल्या शासन निर्णया विषयीची महत्त्वपूर्ण माहिती.
0 Comments