कोरडवाहू क्षेञ विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार अनूदान

Krishi Yojana
krishi Yojana

Krishi Yojana मिञांनो आजच्या महत्वाच्या आर्टीकल मध्ये आम्ही तूम्हाला कोरडवाहू शेत जमीनीच्या विकासा संबधित असलेल्या योजने विषयी माहीती उपलब्ध करून देणार आहोत या योजनेचे नाव आहे कोरडवाहू क्षेञविकास योजना ही योजना केंद्र शासन पूरस्कृत असून राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये राबविली जाते.

चला तर मग जाणून घेऊ या योजने विषयी सविस्तर माहीती.

कोरडवाहू क्षेत्र विकास योजना

मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जमिनीचे क्षेत्र हे कोरडवाहू शेत जमिनीचे क्षेत्र आहे या कोरडवाहू विषयक जमिनीच्या क्षेञाचा विकास करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबविली जाते. 'Krishi Yojana'

कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेचे उद्देश
  • शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत शाश्वत वाढ करून नवीन उपजिविकेच्या साधनांची उपलब्धता करणे व त्या आधारे त्यांचे जीवनमान उंचावणे.
  • तसेच कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनातील जोखीम कमी करून शेतकऱ्यांचा कोरडवाहू शेती बाबत आत्मविश्वास वाढविणे.
 हे कोरडवाहू क्षेञ विकास योजनेचे मुख्य उद्देश आहेत.

कोरडवाहू क्षेञ विकास योजनेसाठी पात्रतेचे निकष

  • या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते.
  • कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेअंतर्गत विमान 50 टक्के निधी अल्प व अत्यल्प भूधारक व महिला शेतकरी लाभधारकावर खर्च करण्याची तरतूद आहे.
  • प्रस्तावित निधीच्या 16% व 8% किंवा अनुसूचित जाती जमाती यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुक्रमे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी निधीची तरतूद आहे.
  • लाभार्थी हा सध्याच्या प्रचलित पीक पद्धतीमध्ये बदल करून एकात्मिक शेती पद्धतीतील बाबी राबविण्यास इच्छूक असला पाहिजे.
इत्यादी या योजनेसाठी पात्रतेचे निकष आहेत.

कोरडवाहू क्षेत्र विकास योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूप

कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना खालील प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येते. Krishi Yojana
  • फळपीक आधारित शेती पद्धती मध्ये 25000 रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते.
  • दूग्धोत्पादक पशुधन आधारित शेती पद्धतीसाठी 40000 रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते.
  • इतर पशुधन आधारित शेती पद्धतीसाठी 25000 रूपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते.
  • वनिकी आधारित शेती पद्धतीसाठी 15000 रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते.
  • ग्रीन हाऊस साठी 468 रुपये प्रति चौ.मी. प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येते.
  • शेडनेट हाऊस साठी 355 रुपये प्रति चौ.मी. प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येते.
  • मुरघास यूनिट साठी 125000 रूपये प्रति युनिट अनुदान देण्यात येते.
  • मधुमक्षिका पालन साठी आठशे रुपये प्रति कॉलनी प्रमाणे अनुदान देण्यात येते.
  • काढणी पश्चात तंत्रज्ञान साठी 4000 रुपये प्रति चौ.मी. प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येते.
  • गांडूळ खत युनिट साठी कायमस्वरूपी 50000 रूपये प्रति युनिट अनुदान देण्यात येते तर हिरवळीचे खत निर्मितीसाठी 2000 प्रति हेक्टर अनुदान कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात येते.
अशाप्रकारे हे महत्त्वपूर्ण लाभ कोरडवाहू क्षेत्र विकास योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना मिळतात.

योजनेसाठी अर्ज कसा आणि कोठे करावा.

कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज करावा.

तसेच कोरडवाहू क्षेत्र विकास योजना ही योजना समूह आधारित असल्याने निवड झालेल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेसाठी अर्ज करावा.

तर मित्रांनो ही होती राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजने विषयीची सविस्तर माहिती.

तुम्हाला हा लेख आवडला असेल व तुम्ही "Krishi Yojana" हा लेख इतर लोकांसोबत नक्कीच शेअर कराल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments