पिक विमा वाटपासह राज्य शासनाने घेतले पाच महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र शासनाने फक्त एक रुपयांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा योजना सुरू केली आहे. 'Cabinet Meeting Maharashtra'
या योजनेसाठी शासनाने आठ हजार सोळा कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. यानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप जलद गतीने सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने सादर केलेल्या सादरीकरणांमध्ये देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणखी पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- मंगरूळ पीर जिल्हा वाशिम येथील सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता देण्यात आली असून यानुसार 1345 हेक्टर शेत जमिनीचे क्षेत्र सिंचित होणार आहे. Cabinet Meeting Maharashtra
- राज्यातल्या विविध ग्रामपंचायत इमारतीच्या कामासाठी निधी वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
- शिक्षण संस्था आता समूह विद्यापीठ स्थापन करू शकणार आहेत याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांना मान्यता देण्यात आली आहे.
- राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे यावेळी सादरीकरण करण्यात आले असून एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी सुचवण्यात आल्या आहेत.
अशा प्रकारे विविध महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून घेण्यात आले आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन बाबत शासनाचा निर्णय परंतु त्यासाठी पूर्ण करावी लागेल ही अट
0 Comments