नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्राला आरोग्य विभागाने दिली मंजूरी New phc sanctions
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र primary health center व एक नवीन आरोग्य उपकेंद्र Sub center उभारण्यासाठी मंजूरी दिली आहे.
या बाबतचा शासन निर्णय आरोग्य विभागाने दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केला आहे.
नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी आरोग्य विभागाने दोन वेगवेगळे शासन निर्णय दिनांक 20/11/2023 रोजी प्रसिद्ध केले आहे.
या शासन निर्णयानुसार मौजे ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणे बाबत आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे तर मौजे पळशी फाटा तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे उपकेंद्र मंजूर करणे बाबत आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे.
यानुसार आता अहमदनगर जिल्ह्यात एक नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येणार आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये एक नवीन आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा अहमदनगर व बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकाकडून स्वागत केले जात आहे या निर्णयामुळे नागरिकांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व आरोग्य उपकेंद्रात उपचार घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नागरिकांना उपचारासाठी लांबच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर होणार पद निर्मिती
मौजे ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व मौजे पळशी फाटा तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे नवीन आरोग्य उपजेंद्र मंजूर करण्यास शासनाने विशेष बाब म्हणून दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे या प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रासाठी विहीत पद्धतीने जागा अधिग्रहित करून जिल्हा परिषदेकडून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पद निर्मिती करण्यासाठी शासनाकडून स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
याचा लाभ निश्चितच या भागातील नागरिकांना होणार आहे.
तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
पारंपारिक वस्त्र उद्योग क्षेत्रातील विणकरांना मिळणार उत्सव भत्ता शासनाचा निर्णय
0 Comments