आरोग्याच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे. सध्या चीन मध्ये निमोनिया आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत या आजाराची लागण लहान मुलांमध्ये होत आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासन अलर्ट झाले असून निमोनिया आजारा संदर्भात प्रतिबंधात्मक पूर्वतयारी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.
चीन मधील निमोनिया उद्रेक बाबत शासन अलर्ट प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे प्रशासनाला दिले आदेश.
अलीकडील काही दिवसांमध्ये चीन या देशामध्ये श्वसनाच्या (निमोनिया) आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत या आजाराचे प्रमाण प्रमुख्याने लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार चीनमधील मुलांमध्ये निमोनिया होण्याचे कारण प्रामूख्याने इनफ्ल्यूएंझा, मायकोप्लाझा,आणि सार्स कोविड-19 हे आहे.
सद्य परिस्थितीमध्ये चीन मधील निमोनिया आजाराच्या उद्रेकाचे महाराष्ट्र राज्य व भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही.
परंतू तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करता प्रतिबंधात्मक पुर्वतयारी व उपाययोजना करणे व सक्षम आरोग्य सुविधा तयार ठेवणे आवश्यक आहे.
यासाठी शासनाने योग्य ती कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून याबाबतचे पत्र सहसंचालक हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग आरोग्य सेवा पुणे यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, महानगरपालिकेचे सर्व आरोग्य अधिकारी, यांना दिले आहे.
निमोनिया आजाराच्या प्रतिबंधात्मक पूर्वतयारीसाठी सहसंचालक आरोग्य सेवा यांनी दिल्या मार्गदर्शक सूचना
- सर्व जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना ILI / Sari सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले असून ILI/ Sari रुग्णांची नोंद आय एच पी पोर्टल वरती करण्याचे सूचित केले आहे.
- रुग्णालयान तयारी करण्याची सूचना देण्यात आली असून सर्व जिल्ह्यातील कोविड रुग्णालयामध्ये खाटांची तयारी, ऑक्सिजन उपलब्धता, व्हेंटिलेटर उपलब्धता, मनुष्यबळ तयार करण्याचे तसेच ऑक्सिजन प्लांट आणि ऑक्सिजन सिलेंडर कार्यान्वित आहे की नाही याची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- प्रयोगशाळा सर्वेक्षण ILI / Sari रुग्णांचे नमुने RTPCR प्रयोगशाळांना पाठविण्याच्या सूचना देण्यात आले आहे. तसेच काही नमुने (Samples) जनूकीय क्रमनिर्धारण करण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- औषध साठा व इतर साधनसामग्री, रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलेंडर, तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इत्यादी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
आरोग्य शिक्षण देण्याचे आरोग्य विभागाचे निर्देश
जनतेमध्ये विनाकारण भीती पसरणार नाही याची दक्षता घेण्याची स्पष्ट सूचना आरोग्य विभागाने दिली असून या संदर्भात जनजागृती करण्याचे आरोग्य विभागाने प्रशासनाला कळविले आहे.
या सोबतच कोविड निमोनिया आयएलआय / सारी या आजाराबाबत आरोग्य शिक्षण देण्याची सूचना आरोग्य विभागाने दिली असून विशेषतः श्वसन संसर्ग असलेल्या व्यक्तीने काळजी घेणे बाबत भर द्यावा व जनतेमध्ये विनाकारण भीती पसरणार नाही याची दक्षता घ्यावी असे आरोग्य विभागाने दिलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
तर अशा पद्धतीने चीनमधील निमोनिया आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून पूर्वतयारी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
0 Comments