आणखी पाच वर्ष मोफत मिळणार रेशन पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

Prime Ministers Announcement
Prime Ministers Announcement

Prime Ministers Announcement मित्रांनो आजच्या नवीन आर्टिकल मध्ये आपले स्वागत आहे एक नवीन महत्त्वाची बातमी समोर येत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे.

 देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या 80 कोटी गरीब नागरिकांना पुढील पाच वर्ष मोफत राशन देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पुढील पाच वर्षापर्यंत गरिबांना मिळणार मोफत रेशन

सध्या भारतामध्ये निवडणुकीचे वारे सुरू आहे आगामी काळात पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड येथील सभेला संबोधित करत असताना गरिबांसाठी मोठी घोषणा केली आहे. 'Prime Ministers Announcement'

यानुसार पुढील पाच वर्षापर्यंत देशातील 80 कोटी गरीब नागरिकांना मोफत रेशन धान्याचा लाभ मिळणार आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की सन 2014 मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यानंतर तुमच्या या मुलाने गरिबांच्या कल्याणाला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे गरिबांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे आमच्या सरकारने आपल्या देशातील गरीब बंधू भगिनी मध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे की त्यांची गरिबी दूर केली जाऊ शकते.

गरिबांच्या कल्याणासाठी सरकारने केले प्रयत्न

छत्तीसगड येथील सभेला संबंधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की लोकांना गरीबीतून बाहेर काढण्याचे काम सरकारने केले आहे. Prime Ministers Announcement

आमच्या सरकारच्या काळात पाच वर्षाच्या कालावधीमध्ये 13.5 कोटीहून अधिक लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. लोकांना गरीबीतून बाहेर काढण्याचे महत्त्वाचे काम आमच्या सरकारने केले आहे गरिबीतून बाहेर आलेले लाखो लोक आम्हाला आशीर्वाद देत आहेत आमच्या सरकारने पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरिबांना मोफत राशन देण्याचे काम केले असून आम्ही आणखी पाच वर्षापर्यंत या योजनेचा लाभ मोफत देशातील नागरिकांना देणार आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड येथील सभेला संबोधित करताना सांगितले आहे.

पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षापर्यंत मोफत रेशन देशातील 80 कोटी लाभार्थ्यांना मिळणार आहे या बाबतचा निर्णय सरकार घेणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

तर मित्रांनो ही होती पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षापर्यंत मोफत रेशन देण्या बाबतची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणे विषयीची महत्त्वाची बातमी.

मी आशा करतो की तूम्हाला "Prime Ministers Announcement" हा लेख आवडला असेल धन्यवाद.

Post a Comment

0 Comments