राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ Rajya Shaskiya Karmachari Mahagai Bhatta Wadh

Shaskiya karmachari Mahagai Bhatta Wadh
Shaskiya karmachari Mahagai Bhatta Wadh

Rajya Shaskiya Karmacharyanchya Mahagai Bhatyamadhe Wadh महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

या बाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केला आहे. 

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चार टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजीच्या जीआर नुसार घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने हा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. 'Rajya Shaskiya karmachari Mahagai Bhatta Wadh'

या शासन निर्णयानुसार दिनांक 1 जुलै 2023 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञय महागाई भत्त्याचा दर 42% वरून 46% करण्यात आला आहे. 

या महागाई भत्त्याची वाढ दिनांक १ जुलै 2023 पासून देण्यात येणार असून दिनांक १ जुलै 2023 ते दिनांक 31 ऑक्टोबर २०२३ या कालावधीमधील 4% महागाई भत्त्याची थकीत रक्कम माहे नोव्हेंबर 2023 च्या वेतना सोबत रोखीने शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे असा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

या निर्णयानूसार माहे जुलै 2023 पासून ते माहे ऑक्टोबर 2023 पर्यंतची फरकाची रक्कम (एरीयस) माहे नोव्हेंबर 2023 च्या वेतनासोबत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 

तसेच या शासन निर्णयानुसार महागाई भत्त्याची रक्कम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना प्रदान करण्या संदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू असणार आहे 

या तरतुदी व कार्यपद्धती नुसारच सदरील महागाई भत्त्याची वाढ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै 2023 पासून मिळणार आहे. 

अशा प्रकारे हा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या निर्णयाचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना होणार आहे.
 
मी आशा करतो की तुम्हाला "Rajya Shaskiya Karmachari Mahagai Bhatta Wadh" हा लेख आवडला असेल धन्यवाद.

कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2023 - 2024 साठी निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वितरित होणार राज्य शासनाचा निर्णय

Post a Comment

0 Comments