पारंपारिक वस्ञोद्योग क्षेत्रातील विणकरांसाठी शासनाची उत्सव भत्ता योजना आजपासून राज्यात लागू
महाराष्ट्र राज्यामध्ये वस्ञोद्योगाच्या वाढीस चालना देण्यासाठी व वस्त्र उद्योगाला आवश्यक त्या उपाययोजनांचा हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 9/11/2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 - 2028 जाहीर केले आहे. 'Scheme For Handloom weaver'
एकात्मिक व शाश्वत वस्त्र उद्योग धोरणाचे उद्दिष्ट
महाराष्ट्राच्या वस्त्र उद्योग क्षेत्राला प्राचीन काळापासून प्रदीर्घ इतिहास आहे.
कापूस, रेशीम आणि लोकर यासह विविध प्रकारच्या सामग्री पासून वस्त्रे तयार केली जातात.
उपजीविकेचे संरक्षण निश्चित करून पारंपारिक वस्त्रोद्योग विनकरांना इतर रोजगारांकडे स्थलांतरित होण्यापासून परावृत्त करण्यासाठी अतिरिक्त प्रोत्साहन देणे हे एकात्मिक व शाश्वत वस्त्र उद्योग धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शासनाच्या निर्णयानुसार हे पाच वस्त्र उद्योग पारंपारिक वस्त्र उद्योग म्हणून मान्य आहेत
महाराष्ट्र राज्यातील या पाच मान्यता प्राप्त पारंपारिक वस्त्र उद्योग क्षेत्रातील प्रामाणित व नोंदणीकृत विनकरांना गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता मिळणार असून आज दिनांक 9/11/2023 पासून राज्य शासनाने उत्सव भत्ता योजना महाराष्ट्र राज्यात लागू केली आहे. ही योजना 31 मार्च 2028 पर्यंत लागू असणार आहे. Scheme For Handloom weaver
उत्सव भत्ता योजनेसाठी पात्रतेचे निकष
- लाभार्थी विणकर हा शासन मान्यता प्राप्त असलेल्या पाच पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील जिल्हा / प्रादेशिक विभागांतर्गत प्रामाणित व नोंदणीकृत विणकर असावा.
- लाभार्थी विनकर महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- केंद्र शासनाने अलीकडील काळात केलेल्या हातमाग जनगणनेच्या लेटेस्ट हॅन्डलूम सेंसेस यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे.
- पारंपारिक वस्त्र उद्योग विणकर असल्याचा पुरावा आवश्यक आहे.
- लाभार्थ्याचे नावे आधार लिंक बँक खाते असणे आवश्यक आहे.
उत्सव भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी हे पात्रतेचे निकष असून निकष पूर्ण करत असलेल्या प्रामाणित व नोंदणीकृत विनकरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
उत्सव भत्ता योजनेचे लाभ किती रुपये मिळणार उत्सव भत्ता
- उत्सव भत्ता योजने अंतर्गत पाच पारंपारिक वस्त्र उद्योग क्षेत्रातील प्रामाणित व नोंदणीकृत हातमाग विनकरांना गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता मिळणार आहे.
- यानुसार पुरुष विनकर यांना प्रति पूरूष 10000 रुपये उत्सव भत्ता मिळणार आहे.
- तर महिला विनकर यांना प्रति महिला विनकर पंधरा हजार रुपये उत्सव भत्ता मिळणार आहे.
- हा उत्सव भत्ता डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थी विनकारांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट जमा केला जाणार आहे.
- याची जबाबदारी शासनाने आयुक्त वस्त्र उद्योग यांच्यावर सोपवली आहे
- योजनेचे पहीले वर्ष असल्याने सन 2023 - 2024 मध्ये उत्सव भत्ता गणेश चतूर्थी ऐवजी मकर संक्राती निमित्त मंजूर करण्यात येईल व नंतर पूढील वर्षी म्हणजे 2024 - 2025 पासून गणेश चतूर्थी निमित्त मंजूर करण्यात येणार आहे.
उत्सव भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा आणि कोठे करावा
- उत्सव भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थी विणकर यांनी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रासह संबंधीत प्रादेशिक उपआयूक्त यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करायचे आहेत.
- ऑनलाईन पद्धती विकसित होईपर्यंत ऑफलाइन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत.
सविस्तर शासन निर्णय वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अशा प्रकारे या योजनेचा लाभ पाच पारंपारिक वस्त्र उद्योग क्षेत्रातील लाभार्थी विणकर यांना मिळणार आहे.
0 Comments