विविध योजनांची माहिती उद्योजकांना व्हावी यासाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न Yojana chi mahiti sathi karyashala

Yojana chi mahiti sathi karyashala
Yojana chi mahiti sathi karyashala

योजनांची माहिती उद्योजकांना व्हावी या उद्देशाने बीड शहरांमध्ये एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

विविध योजनांची माहिती उद्योजकांना व्हावी यासाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

उद्योग संचालनालय मुंबई अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र बीड व इतर निगडीत विभागाशी संबंधित कार्यालय मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच ठिकाणी एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व विभागाच्या सहकार्याने हॉटेल ग्रँड यशोदा बीड येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 'Yojana chi mahiti sathi karyashala'

या कार्यशाळेला बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी व इतर अधिकाऱ्यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी सांगितले की बीड जिल्ह्यात सोयाबीन कापूस यांच्यासह सीताफळ आंबा मोसंबी ड्रॅगन फ्रुट केसर आंबा यांचे चांगले उत्पादन होते ही उत्पादने परदेशात निर्यात झाली पाहिजेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सोयाबीन, कापूस, सिताफळ, आंबा, मोसंबी, ड्रॅगन फ्रुट, केसर आंबा, या सर्व उत्पादनांचा दर्जा आणखी वाढवून ही उत्पादने परदेशात निर्यात झाली पाहीजे यासाठी चर्चा करणे व उपाययोजना करणे गरजेचे आहे तसेच फलोत्पादन हे नाशवंत असून त्यांचे वय कसे वाढवता येईल यावर संशोधन होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन करताना म्हटले.

शेतकऱ्यांनी शेतमालाच्या निर्यातीसाठी प्रयत्न करावेत जिल्हाधिकारी यांची सूचना

पुढील काळामध्ये गेवराई येथे लॉजिस्टिक पार्क होणार असून शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी केले. Yojana chi mahiti sathi karyashala

 तसेच शेतकऱ्यांनी पुढे येऊन त्यांचे उत्पादन जिल्ह्या पुरते मर्यादित न ठेवता त्याला राज्यात व राज्य बाहेर तसेच इतर देशात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली.

कार्य शाळेमध्ये विविध विषयावर अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

  •  बीड जिल्ह्यातील उत्पादित मालाचे निर्यातीचे नियोजन या विषयावर इ अँड वाय चे सल्लागार अमोल मोहिते यांनी मार्गदर्शन केले.  
  • मध्यम व सूक्ष्म लघुउद्योगांना SIDBI ची कशी मदत होईल याबाबत SIDBI चे सहाय्यक महाव्यवस्थापक सीमांत पारधी यांनी मार्गदर्शन केले. 
  • आयडीबीआय कॅपिटल चे सीनियर executive मूकुंद तिवारी यांनी आयडीबीआय आर्थिक मदत कशी देऊ शकते याबद्दल माहिती दिली.
  •  ओएनडीसी चे विकास अधिकारी धीरज कुमार यांनी ओएनडीसी च्या माध्यमातून डिजिटल व्यवसायाचे महत्त्व पटवून सांगितले.

 अशाप्रकारे या सह इतर अनेक विषयावर या कार्यशाळेमध्ये विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकारी यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले व अनेक योजनांची माहिती उद्योजकांना दिली.

तुम्हाला ही "Yojana chi mahiti sathi karyashala" बातमी आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments