आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी कृती दल स्थापन Amba pik kid niyantran upay yojana

Amba pik kid niyantran upay yojana
Amba pik kid niyantran upay yojana

Amba Pik Kid Rog Niyantran Upay Yojana रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगाच्या नियंत्रणा करिता महाराष्ट्र शासनाने कृती दल टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आंबा पिकावरील कीड रोगाच्या नियंत्रणासाठी कृती दल स्थापन महाराष्ट्र शासनाचा निर्णय

महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागामध्ये सद्य परिस्थितीत  काही आंबा बागांमध्ये तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडी, व तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे अशा आंबा बागामध्ये प्रादुर्भाव ओळखून त्वरित उपाययोजना सुरू करणे आवश्यक आहे. 'Amba Pik Kid Rog Niyantran Upay Yojana'

यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी सह्याद्री अतिथी गृह मलबार हिल येथे बैठक संपन्न झाली होती या बैठकीमध्ये आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी संशोधन करून उपाययोजना करण्यासाठी तात्काळ बैठक आयोजित करून कृती दल (Task Force ) स्थापन करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिले होते. 

त्यानुसार आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी संशोधन करून उचित उपाययोजना करण्यासाठी कृती दल स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केला आहे. Amba Pik Kid Rog Niyantran Upay Yojana

कृती दलामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे

रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्ह्यातील आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या नियंत्रणाकरिता खालील प्रमाणे कृती दल (Task Force) स्थापन करण्यात आले आहे.

1) संशोधक संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली - अध्यक्ष हे या कृतीदलाचे अध्यक्ष असतील.

2) विभाग प्रमुख कृषी कीटक शास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली - सदस्य

3) सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली - सदस्य 

4) सहयोगी प्राध्यापक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली - सदस्य 

5) सहाय्यक प्राध्यापक, कृषी कीटकनाशक विभाग डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली - सदस्य 

6) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी - सदस्य

7) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग - सदस्य

8) विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग ठाणे - सदस्य सचिव 

या प्रमाणे आंबा पिकावरील कीड रोग नियंत्रणासाठी कृती दल Task Force स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कृती दलावर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी संशोधन करून उपाययोजना करणे व त्याबाबतचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करणे बाबतची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. "Amba Pik Kid Rog Niyantran Upay Yojana"

तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.





Post a Comment

0 Comments