कोरोनाच्या JN 1 व्हेरियंटला घाबरू नका सतर्क रहा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन

Covid JN 1 Government Alart
Covid JN 1 Government Alart

Covid new variant maharashtra government alart देशातील विविध राज्यामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाच्या जे एन 1 या नवीन व्हेरीयंटचे रुग्ण आढळले आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला असून आरोग्य सुविधा तयार ठेवण्याच्या सूचना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

कोरोनाच्या JN 1 व्हेरीयंटला घाबरू नका सतर्क राहा - आरोग्य मंत्री तानाजी सावंत 

राज्यात कोरोनाच्या JN 1 या नवीन व्हेरीयंटचे रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोव्हीडच्या वर्तवणुकीचे काटकसरीने पालन करावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे. 

कोरोनाच्या जे एन 1 साठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून या संदर्भात खालील नमूद महत्त्वाचे निर्देश आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. 

  • संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्यात याव्यात.
  • त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करणे.
  • संशयित रुग्णावर आवश्यक ते उपचार त्वरित करणे.
  • जिल्हास्तरावर रुग्णालयातील यंत्रणांची गांभीर्याने मॉकड्रिल करून तीन दिवसात या विषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा

Covid JN 1 Maharashtra Government Alart
Covid JN 1 Maharashtra Government Alart

कोरोनाच्या JN 1 या नवीन व्हेरीयंटच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा पुणे येथे घेतला. 

त्यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे आयोजित बैठकीमध्ये आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेऊन अनेक महत्त्वपूर्ण सूचना व निर्देश दिले आहेत.

या बैठकीला आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार, सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, व तसेच आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

चाचणी, सर्वेक्षण, आणि उपचार, या ञिसूञीचा अवलंब करावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत

 जे एन 1 हा व्हेरीयंट धोकादायक नसला तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीने सतर्क राहणे आवश्यक आहे अशी सूचना आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी दिली आहे. 

या संदर्भात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी खालील महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना प्रशासनाला दिल्या असून सर्व तयारीनिशी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • नागरिकांमध्ये अफवा पसरून भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी जिल्हा स्तरापासून घेण्यात यावी यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. 
  • चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी व सर्वेक्षण जलद गतीने करावे.
  • जे एन 1 वर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे गांभीर्याने आणि वस्तुस्थितीला धरून मॉकड्रील करावे. 
  • कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करता आरोग्य यंत्रणा, विलगीकरण कक्ष, ऑक्सिजनची सुविधा, अति दक्षता विभाग, व्हेंटिलेटर, आणि महत्त्वाची सर्व उपकरणे कार्यरत असल्याबाबत प्रत्यक्ष जाऊन तपासणी करावी आणि त्याबाबतचे व्हिडिओ तयार करून राज्यस्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावेत. 

अशा महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. 

प्रत्येक जिल्ह्यात संशयित रुग्णांच्या चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज असून चाचणी, सर्वेक्षण, आणि उपचार, या ञिसूञीचा अवलंब करावा असे निर्देश डॉ. सावंत यांनी प्रशासनाला दिले आहेत.

नागरिकांना व प्रसार माध्यमांना माहिती देण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आरोग्यमंत्री तानाजी सावंत

नागरिकांमध्ये कोरोना संदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी समाज माध्यमासह, जिल्हा रुग्णालय, आपला दवाखाना, येथे फलक लावण्यात यावेत. 

त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरू नये यासाठी माध्यमांना माहिती देण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. 

या अधिकाऱ्या मार्फतच या विषयीची अधिकृत माहिती देण्यात यावी जेणेकरून अफवा आणि चुकीची माहिती प्रसारित होणार नाही. 

तसेच प्रसार माध्यमांनीही या विषयीचे वृत्त देताना वस्तूस्थीतीची पडताळणी करावी आणी नागरिकांमध्ये विनाकारण भीती पसरेल अशी चुकीची माहिती प्रसारित करू नये असे आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

चीनमधील निमोनिया उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन अलर्ट प्रतिबंधात्मक पूर्वतयारी तयारी करण्याचे दिले आदेश Pneumonia disease prevention prerequisites

Post a Comment

0 Comments